Sunday, 26 February 2017

वीरा.... मातृभूमी तुझी मी....


वीरा, मातृभूमी तुझी मी

कधीचीच धन्य धन्य झाली

 

जन्मठेप भोगली

काळ्या पाण्यावर तू

गाथा बलिदानाची कोरली

किती हाल सोसले

किती यातना सोसल्या

हृदयसागर तुझा मजसाठी तळमळला

 

वीरा, मातृभूमी तुझी मी

कधीचीच धन्य धन्य झाली

 

अत्त्युच्य कोटीचा प्रखर देशभक्त,

क्रांतीकारी तू

अंधश्रध्द पाखंडींचे खंडन केले तू

तुरुंगातल्या भिंतींवरही

उत्स्फूर्त काव्य लिहिले तू

माझा विरह असह्य होऊन

सागरही पोहून गेलास तू

खवळत्या सागरासम खवळलास तू

मायभूसाठी ह्या सदैव झटलास तू

वीरस्पर्शाने तुझ्या ह्या...

तो सागरही धन्य झाला

सावरकरा, मला तू असे सावरले

स्मरण तुझे आज होताच नयन हे दाटले

माया, ममता, नाती सारी तू सोडली

 

वीरा, मातृभूमी तुझी मी

कधीचीच धन्य धन्य झाली

वीरा, मातृभूमी तुझी मी

कधीचीच धन्य धन्य झाली.

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२६//२०१७.

वीर सावरकर स्मृतिदिन.

No comments:

Post a Comment