Friday, 10 November 2017

गं सखी...गं सबला

तुझं स्त्रीत्व

तुझी ओळख

तुझं स्वत्व

तुझं अस्तित्व

मोकळं कर तुझं

मन अवकाश

 
गं सखी

गं सखी

गं सबला

गं सबला
 

तुझं कर्तृत्व

तुझं दातृत्व

तुझं मातृत्व

जगावेगळं सारतत्व

ओळखूनी तू स्वतःस

मोडूनी टाक सारे अंकुश

 
गं सखी

गं सखी

गं सबला

गं सबला

 
विश्वाचा भक्कम पाया तू

जगावेगळी माया तू

तू कसली गं अबला??

तू तर आहेस सबला

सरसाव तू , भरधाव तू पुढे पुढे

होऊनि निश्चल निर्भया

 
गं सखी

गं सखी

गं सबला

गं सबला
 

तुझा मान

तुझा सन्मान

तुझा अभिमान

तुझी शान

तुझं स्त्रीत्व

तुझ्याविना हे जग निःसत्व

बांधुनी ठेव ठायी ठायी

तुझे स्वतंत्र कार्य पाश

 
गं सखी

गं सखी

गं सबला

गं सबला

 
तूच शक्ती

तूच मुक्ती

मार्गातील ह्या दूर कर

तूच सक्ती

तूच निर्मिती

ओतप्रोत भरलेली

तुझ्यातच वसे प्रीती

घडव स्वतःला, बहरव स्वतःला

दाखव जगा तुझे महत्व

पंखांत तुझिया तुझेच भरुनी बळ

विहर आकाशी यथावकाश

 
गं सखी

गं सखी

गं सबला

गं सबला


मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१० नोव्हेंबर २०१७.

No comments:

Post a Comment