Sunday, 19 November 2017

झाशीची राणी


कशी लढली असेल ती झाशीची राणी??

घोडा तो रुबाबदार

त्यावर होऊनी ती स्वार

इंग्रजांचा खाऊनी खार

चित्कारली तिची वाणी

 
कशी लढली असेल ती झाशीची राणी??

 
पाठीसी बांधुनी बाळ

घेऊनी हाती तलवार

स्त्री बनली ती मर्दानी

वीरांगना समरांगणी

 
कशी लढली असेल ती झाशीची राणी??

बघुनी मर्दानगी तिची

डोळे दिपले इंग्रजांचे

स्वातंत्र्याची हाक तिची

गर्जू लागली कर्णोपकर्णी

 
कशी लढली असेल ती झाशीची राणी??

 
लढता लढता अविरत

जिद्दीने लढत राहिली

अखेर धारा विक्रमी तिची

धारातीर्थी पडली

जिद्द नाही सुटली तिची

आस नाही झिजली

पराक्रम नाही शमला

स्वातंत्र्य इच्छा नाही मेली

वाचता तिची वीरगाथा

नयनांत साचले पाणी

 
कशी लढली असेल ती झाशीची राणी??

कशी लढली असेल ती झाशीची राणी??

 मृदुला मुकुंद पाटखेडकर.

१९/११/२०१७.

No comments:

Post a Comment