अरुण
मामाचा
आज
वाढदिवस.
त्यानिमित्ताने....
ब्रह्माः
असं
होय
नारदा!!!
खोडकर
झालास
हल्ली
तू
फार!!
माझी
परीक्षा
घेतोस
होय!!
लबाडा!!
काय
हे???
ब्रह्माः
खरंय
नारदा!
वेगळाच
आहे
ना
हा
अरुण!!
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
अरुण
मामा
म्हणजे
सदैव
प्रगतीशील
राहणारा,
काळासोबत
नेहमी
update राहून
चालणारा,
विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन ठेवून कोणत्याही विषयाच्या खोलात जाणारा, अस्खलित मराठी बोलणारा आणि लिहिणारा एक सन्माननीय व्यक्ती!! व्यक्ती कशी असावी याचा आदर्श!!
कित्ती
लिहलंय
त्याने...अबब!!! मी त्याने लिहिलेलं सर्व वाचलंय. तो सतत लिहत असतो म्हणे, त्याशिवाय एवढे Blog त्याने तयार केले नसते!!! त्याच्या एकेका Blog वरील लांबलचक, पण अर्थपूर्ण लिखाण वाचून वाचक थक्क होतो. मग ती 'सदाशिव सृष्टी' असो की 'कापूसकोंड्या' असो!!! माझ्यासारखी सामान्य वाचक तर डोकंच खाजवायला लागते!!! पुन्हा पुन्हा वाचावंसं वाटतं ते सारं!! लिखाणाची नवी शैली प्रत्येकवेळी नव्याने आकर्षित करते. ब्रह्मा आणि नारद ही आधीच अमर असलेली जोडी त्याने त्याच्या लेखन प्रतिभेने इतकी अमर केली की, खरंच जर स्वर्गात ब्रह्मा-नारद असतील तर त्यांनीही हे सारं साहित्य आवडीने वाचलं असणार अशी कल्पना माझ्या मनांत येते आणि आलेली ही कल्पना अगदीच अतिशयोक्ती नाही तर या स्तुतीतील अक्षर अन् अक्षर सत्य आहे. कविता मामीने शोधलेल्या नवीन शब्दानुसार...म्हणजेच 'अक्षरोक्षर सत्य'!!!
अगदी
ब्रह्मा-नारद यांच्या संवादातूनच बघू या आपण आता त्याला!!! साचा त्याचाच फक्त सारण मी तयार केलेलं!!!!
नारदः
ब्रह्मा,
बघितलंस
का
तू?
ती
म्हातारीची
नात
काहीतरी
लिहितेय
रे!!
आता
डोळे
जरा
अकोल्याकडेच
लावतो
माझे!!
पण
मला
डोकावू
डोकावू
बघावं
लागतंय
रे...तिच्या memo widget मध्ये...वाचतोय हळूहळू काय लिहतेय ती
ब्रह्माः
अरे
नारदा...मी ओळखलं की ती कुणाविषयी लिहत असावी. अरे! आज त्या मास्तरच्या मुलाचा, अरुणचा वाढदिवस नाही का?? बघितला होता की तो सोहळा आपण वाड्यातला!!
नारदः
'नारायण'
नारायण'!!!
विसरलो
नाही
मी
ब्रह्मा!!
मला
तुझ्या
तोंडून
वदवून
घ्यायचे
होते!!!
नारदः
ब्रह्मा,
पुरे
झाली
आता
आपली
गम्मत!!
आज
त्या
अरुणचं
महत्त्व.
मला
तर
तो
अरुण
म्हणजे...हे म्हणजे...आपलं म्हणजे...खूपच बा!!! असाच वाटतो.
ब्रह्माः
म्हणजे
रे
नारदा?
मी
समजलो
नाही??
किती
वेळ
घालवशील
आता?
स्पष्ट
सांग
की??
नारदः
ब्रह्मा,
मी
फार
कमी
वैज्ञानिक
असे
पाहिले
रे
की
ज्यांना
विज्ञानाच्या तोडीने साहित्याची जाण आहे. मराठीचा अभिमान आहे. तू पाहिलेस का whatsapp वरील भाची मृदुलाशी त्याचे संवाद...तो तारीख मराठीतून लिहितो रे!! Thanks न लिहिता धन्यवाद लिहितो रे!! सर्वांना लिहावयास प्रेरणा देतो रे!! 'खूप लिही'!! असा मृदुलास आशिर्वाद देतो रे!!
नारदः
होय
ब्रह्मा,
तल्लख
बुध्दीमत्ता
लाभलेला
हा
अरुण
कल्पकतेचा
वटवृक्ष
आहे.
तुझ्यासारखाच कल्पक ब्रह्मा!! त्याच्या व्यक्तित्वाला तरल विनोदी कडा आहे. व्यक्तित्वाचे अनेक अष्टपैलू त्यांत एकवटले आहेत.
ब्रह्माः
चल
नारदा,
मी
पुन्हा
त्याचं
साहित्य
वाचावयास
घेतो.
आता
पुन्हा
नव्याने
मला
तू
समजावून
सांग
रे!
त्याने
लिहिलेले
'काव्य',
त्यातले
भावार्थ
मला
नव्याने
जाणून
घ्यायचे
आहेत.
चल
नारदा,
लवकर!!
लाव
internet, उघड
ते
सगळे
Blog!! Link तर
माहितच
आहेत
तुला!!
चल
लवकर,
आता
अरुणोदय
होईल!!
बघ,
ती
म्हातारी,
पाणावल्या
डोळ्यांनी
आजचा
दिवस
आठवत,
पदराने
डोळे
पुसत
मनानेच
त्याचं
औक्षण
करतेय
रे!!
बघ
ती
गीता,
वृंदा,
विजया,
त्याची
पत्नी
सरिता,
त्याच्या
साहित्यात
डोकं
खूपसून
बसलीत
रे!!
नारदा,
त्याच्या
स्फूर्तीचा
अखंडित
ओघ
असाच
वाहता
राहू
दे,
त्यास
दीर्घायुष्य
लाभू
दे.
हाच
माझा
आर्शिर्वाद
आहे
रे...त्या सदाशिव सृष्टीतल्या अरुणला!!
२५
नोव्हेंबर
२०१७.
No comments:
Post a Comment