आज अचानक
आठवला मज तो
प्राजक्त
तळ्याच्या काठी उभा
राही तो एकलाच
मुक्त
बहर त्याला
जेंव्हा जेंव्हा येई
कोटी कोटी
फुलांचा सडा सांडला
जाई
उच्च कोटीचा
आनंद तनमनांतून जाई
तळ्यात बघता त्याचे
मोहक प्रतिबिंब केशरी कडा, नाजूक
कुसुमांनी आसमंतात धुंदी आणून
जाई
विखुरता पानें, फुले
त्याची
वा-यासरशी
पसरता इकडे तिकडे
जणू वाटे मज
त्यावेळी तो भटका
विमुक्त
आज अचानक
आठवला मज तो
प्राजक्त
इवलेसे इटुकलेसे असे
प्राजक्ताचे फूल
का न
कळे!! कुणास ठाऊक
मला सदोदित पडे
त्याची मोहक भूल तासन्तास
बघत राही त्याला
एकटक कोण आलं,
कोण गेलं याची
कदा न कळे
चाहूल
बहरता बहरता बहरुन
बहरता.....
अचानक तो ओसरला
जाई
कोमेजून
जाता फुले त्याची
मनही खिन्न करुन
जाई बहर त्याचा
आठवून मन उचंबळून
येतं आज अचानक
आठवला मज तो
प्राजक्त
प्राजक्त मज तो
वाटे जणू प्रिय
सखा माझा
ओसरता ओसरता बहरलो
होतो मी कधी
कोसळता कोसळता सावरलो होतो
मी कधी
ओसरण्याच्या वाटेवरुनी जाता.....
हे आठव
तू सखे गं,
बहरलो होतोच ना
मी कधी
बहर आठव,
बहर आठव...
ओसर नाही,
ओसर नाही...
आनंदाचे क्षण आठव,
आनंदाचे क्षण आठव......
दुःखाचे क्षण नाही,
दुःखाचे क्षण नाही
ओसरलो आता मी
जरी
बहर ओसंडून
फुलेन मी कधीतरी
बहरेन मी कधीतरी
फुलेन मी कधीतरी
फुली फुलून
येईल मी कधीतरी
गं सखे,
दुःखवाट चालता चालता
सुखवाट तुज गवसेल
नक्की कधीतरी
जणू वाटे,
सांगू लागला मज
तो प्राजक्त
आयुष्याशी गोड नातं
ठेव तू मनसोक्त
आनंदी राहा मनसोक्त....
स्वानंदी होऊनी जग
मनसोक्त....
आज अचानक
आठवला मज तो
प्राजक्त
आज अचानक
आठवला मज तो
प्राजक्त
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
११/१/२०१६.
No comments:
Post a Comment