तुझ्या पावलांखालच्या उन्हाने
सावली होऊन जावं
आयुष्य तुझं मुली,
कोमल, हळूवार, अलगद
फुलावं
उन्हातही बनून कवडसा
वाढविले मी तुला
तळहातांच्या
फोडापरी जपले मी
तुला
माझ्यासारखंच
त्यानेही तुला जपत
जपत जीवन जगावं
फुलराणी, तुझ्या आयुष्यात असं
प्रियकरानं यावं
माझ्या काळजाचा तुकडा
तू,
त्याच्या हृदयाची राणी
होऊन जगावं
राजा-राणीच्या संसारात मी
'बाप' म्हणून मिरवावं
नातवंडांसोबत 'आजोबा' म्हणून रमावं
संसाराच्या
बगिच्यात तुझ्या; कळीफुलांनी उमलून
यावं ज्ञान ज्योतीच्या
तेजाने यशोदीप उजळून यावं
आयुष्य तुझं सहज,
सुंदर पुढे पुढे
जात राहावं काळोखाला
सारुन मागे प्रकाशाने
तत्पर व्हावं
चालता तू वाट
यशाची बापाच्या या
शुभेच्छांना स्मरावं फुलापरी मुली
तू, खुलत खुलत
खुलावं खुलत खुलत
खुलावं.......
खुलत खुलत खुलावं.......!!!
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
५/१/२०१७.
No comments:
Post a Comment