बदललेल्या जाणिवांची संवेदना
असते
अंतरीच्या
भावभावनांची उत्तेजना असते
प्रतिमांचा
आडोसा घेऊन गोष्टी
ती लपवत असते
विशिष्ट एका चौकटीत
ती बसत नसते
जेंव्हा
जिथे वाटेल तिथे
ती जात असते
जिथे असाल, जसे असाल,
आंतरिक उमाळ्यांना साद ती
घालत असते लिहिणा-या अंतर्मनांनाच
ठाऊक, कविता कशी
त्या क्षणाची असते
अनुभवतो
आपण जे-जे;
शब्दांची तीव्रता ती त्यात
ओतते कोसळत असतो
पाऊस बाहेर; मनात
मात्र तीव्र उन्हाची
झळा ती देते
कवितेचा लागता तुकडा हाती,
एकेका विषयात ती
रमविते पत्र लिहावे
जसे कुणालातरी तसे
काहीसे दृश्य-अदृश्य डोळ्यांसमोर
ती आणत असते
जे दृश्य-अदृश्य डोळ्यांसमोर
येतं तुझ्या, ते
इतरांनाही सांग!! असं ती
कवींना सांगत असते अनुभवांच्या
वेगवेगळ्या टप्प्यांवर भुरळ ती
घालत असते जे
जगताय तुम्ही!! ते
लिहिण्याचं बळ ती
देत असते
प्रामाणिक
कवींशी कविताही प्रामाणिक असते
वैचारिक
उंचीच्या ठेवीवर तिचा पाया
ती भक्कम करते
मित्रहो! अशा कवींनाच
केवळ कविता ही
प्रसन्न करते थिल्लर,
हिणकस, उथळ कवींची
कविता ही खोटारडी
असते
नुसत्या
भावनाच नाही तर
अस्सल प्रश्नांचं भान राखणं
तिला हवं असतं
जे चांगलं आहे,
अस्सल आहे तेच
लोकांपर्यन्त पोहोचवावं लागतं कवितेच्या
गावात ह्या म्हणूनच
सच्चेपणानं जगावं लागतं शब्दनिष्ठ
कवींना पुढे ठेवून
हसत हसत कविता
मागे उभी असते
विचारांचे मोती बरसता
वरदान ती तेंव्हाच
देत असते
कविता अशी असते...कविता अशी असते
शब्दफुलांनी
बहरुन येता भावविभोर
ती करुन टाकते
अंतरीच्या या भावना
त्या अंतरी नेत
असते अंतरीची अंतरे
दूर करुनी शब्दकळांनी
जोडत असते शब्द
तरल, भावस्पर्शांच्या अजब
दुनियेत नेत असते
शब्दाशब्दांच्या,
अगणित भावनांच्या अव्यक्त
जाणिवांतून कविता व्यक्त होत
असते शब्दप्रभूंच्या निर्मल
भाव जलाशयात कविता
तरंगत असते एकाग्रचित्त
कवी मनांवर अलगद
आक्रमण करीत असते
संदर्भ, गोष्टींना खुलं असण्याची
जागा म्हणजेच कविता
असते
अंतरीच्या
भावबंधांवर मुक्तपणे ती जगत
असते मृदुल, मधुर
भावशब्दांनी कवीमनांना सुकोमल घडवित
असते
कविता अशी असते...कविता अशी असते.
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
१९/१/२०१७.
No comments:
Post a Comment