कधी तू, आनंदाचा
खळखळ वाहणारा निर्झर
कधी तू, मायेच्या
ओलाव्यांत फुटणारा पाझर
कधी तू, क्षणांत
उडसी आकाशी होऊन
पाखरु पाखरु
कधी तू,
इकडून तिकडे फिरसी
कधी तू,
तिकडून इकडे येसी
कधी तू,
असाही, कधी तू,
तसाही
कवेत आणि
मुठीत तुला कसे
मी धरु??
कधी तू,
बागडणा-या फुलांसारखा, पसरवून
सुगंधी वारा सुगंधी
वा-यांच्या या
आनंदी झुळुकीत
दुःखांना न राही
तेंव्हा थारा
कधी तू,
वाढता वाढता वाढविशी
रागाचा पारा कधी
तू, फुलता फुलता
फुलविशी मन मोराचा
पिसारा
रे मना, आकलनापल्याडचा
तुझा हा गुंता
सारा मनाचा मनाभोवतीच
घातला जाई पिंगा
सारा शरीररुपी या
रानात माझ्या, कधी
रे लागेल तुझा
थांग सारा
मनाच्या
आंदोलनांशी हस्तांदोलन करण्या पर्याय
न सापडे दुसरा
कधी तू, छेड
काढणारा, छळणारा छलिया कधी
तू, चारचौघांच्या वाटेने
न जाणारा अवचित
अवलिया कधी तू,
जय-पराजयाच्या हिंदोळ्यांवर
खेळविणारा खेळिया
कधी तू, कसे
तू, किती तू
साठवितोस मना, आठवणींच्या
छटा नि छाया
कधी तू, कसे
तू, किती तू
जुळवितोस नाती मनामनांना
जोडुनिया कधी तू,
कसे तू, किती
तू तोडतोस नाती
एक घाव दोन
तुकडे करुनिया कधी
तुला, कसे तुला,
किती तुला सांभाळावे
लागते रे मना....
बोच-या क्षणी
आंजारुनिया गोंजारुनिया
मना, तुझे
खेळ न्यारे
अनाकलनीय गूढ सारे
कधी तू,
निराशेतही आशेची चटक लावणारा
कधी तू, जय-विजयाची भूल पाडणारा
कधी तू, बळ
प्रेरणेची उभारी घेऊन उंचच
उंच मनोरे उभारणारा
कधी तू, वैरी
न चिंती ते
चिंतणारा
कधी तू, नेहमीच
तू, मिनिटामिनिटाला विचारांचे
प्रवाह बदलवणारा प्रवाही, नित्य,
हृदय केन्द्र बनून
राहणारा.....
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
४/१/२०१७.
No comments:
Post a Comment