चला, आज
स्त्रीशक्तीचा सन्मान करु या
सावित्रीचे आज गुणगान
करु या
अक्षय ऊर्जेच्या स्त्रोताला नमन
करु या
शिक्षणगंगेचे
कार्य तिचे महान
स्मरु या
स्त्री शिक्षणाची जिद्द, ओढ
तिची मनांत भरु
या तिने घेतलेला
वसा निष्काम भावनेने
पुढे नेऊ या
आजही अज्ञानी, अशिक्षित स्त्रीयांना
शिकण्याची नवी उमेद,
आशा, प्रेरणा देऊ
या आजच्या काळानुसार
उपस्थित दगडधोंडे नि खाचखळग्यांना,
समोरील प्रचंड आव्हानांना; तिच्यासारखंच
दूर करु या
सावित्रीच्या
लेकी आपण ताठ
मानेने जगू या
अज्ञानाच्या
काटेरी वाटांवर ज्ञानाची सुंदर
फुले लावू या
ज्या काळात ती जन्मली
त्या काळालाही सलाम
ठोकू या तिच्यामुळेच
दिसतोय आज स्त्री
शिक्षणाचा सुकाळ याचे सदैव
मनांत स्मरण ठेवू
या
प्रत्येक
स्त्रीमध्ये आज; ज्ञानाच्या
अखंड ज्योति लावणा-या त्या
सावित्रीला पाहू या
तुमच्यातही तीच!!!
माझ्यातही तीच!!!
सर्व स्त्रियांमध्ये
आजही आहे तीच!!!
जयंतीनिमित्त
आज तिच्या नतमस्तक
आपण होऊ या.......
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
३/१/२०१७.
No comments:
Post a Comment