वाढदिवसा तुझं येणं......
क्षण अन्
क्षण प्रिय करुन
जाणं
वाढदिवसा तुझं येणं......
गोठलेल्या
स्मृतींना जागं करुन
जाणं
वाढदिवसा तुझं येणं......
भाऊबहिणींसमवेत
आठवणींचा कोलाज् पुन्हा पुन्हा
पाहणं
वाढदिवसा तुझं येणं......
आई-वडिलांचे आशिर्वाद भरभरुन
मिळणं
वाढदिवसा तुझं येणं......
आप्तस्वकीयांच्या
शुभेच्छांना ऊत येणं
वाढदिवसा
तुझं येणं......
शुभेच्छांसोबत भेटवस्तूंचंही मिळणं
वाढदिवसा तुझं येणं......
वाढता वाढता वाढे म्हणत
वयाने वाढणं
वाढदिवसा तुझं येणं......
'श्री' चा 'निवास'
अखंड राहो ही
कामना करणं
वाढदिवसा तुझं येणं......
'तथास्तु'!!
म्हणत कल्याणीने वर
देणं
वाढदिवसा तुझं येणं......
बलवंत, यशवंत ध्येयासाठी संकल्प
करणं
वाढदिवसा तुझं येणं......
सुंदर शरीर, सुंदर मन,
सुंदर बुध्दी देणाऱ्या
'त्या' कर्पूरगौर आशुतोषाचे आभार
मानणं
वाढदिवसा तुझं येणं......
विजयाची
उंचच उंच पताका
गगनचुंबी नेणं
वाढदिवसा तुझं येणं......
सदिच्छा हीच माझी
सर्वांसाठी खुल्या दिलाची कुणाचाही
असो वाढदिवस, केंव्हाही,
कधीही!!!
प्रत्येकाचा
वाढदिवस घेऊन येवो
आनंदाचं गाणं....
प्रत्येकाचा
वाढदिवस घेऊन येवो
आनंदाचं गाणं....
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
७/१/२०१७.
No comments:
Post a Comment