परिसर
सदैव गर्दीचा
शोध
कसा घ्यावा माणसांचा?
अविश्वासी
ह्या दुनियेत
हात
कसा धरु विश्वासाचा?
धावत
सुटतो आपण
शोधात
मायामोहाच्या
ऐकत
राहतो कानांनी
गोष्टी
गोड गोड शब्दांच्या
हसणे
आणिक बोलणे
बरेचदा
असते फसवे
ठाऊक
असूनही सारे
मुकाट
वाटा धरायच्या
ज्यांना
मानतो कधी देव
माणसांतही
कधी प्रकटे रावण
पायाखालची
जमीन सरकते
ओळखू
येतो भाव खोट्या चेहऱ्याचा
म्हणूनच
अशा माणसी दुनियेत
मी
निसर्गाला बिलगते
पाखरांच्या
थव्यासंगे
मीही
झाडाजवळ विसावते
गंध
भरुनी घेते फुलपाकळ्यांचा
नसते
जात नि पात सृष्टीजवळ
नसते
ठाऊक त्यास इथली वावटळ
माणसी
दुनियेला कलंक किती सारे
शोधते
निसर्गी दरवळ चंदनाचा
भेटतो
सखा तिथेच जीवाचा
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
२१
नोव्हेंबर २०१९.
No comments:
Post a Comment