पार
करत मैलांचे दगड
चालत
राहीन तोवर
दुःखभरला
तरी पहाड
मनांस
देईल घट्ट पकड
काट्याकुट्यातली
वाट
जीवांत
जीव जोवर
चालत
राहीन तोवर
थकणार
नाही आशा
पदरी
नव्हतीच निराशा
प्रयत्नांच्या
पराकाष्ठेत
थांबणार
नाही पळभर
चालत
राहीन तोवर
उजाड
रुक्ष वाळवंट
सुकला
जरी अधरोष्ठ
तहान
ज्ञानाची डोळाभर
चालत
राहीन तोवर
येणार
नाही कधी कंटाळा
विरक्त
होणार नाही चैतन्य
श्वासांत
श्वास निर्मळ जोवर
चालत
राहीन तोवर
जीवाजीवांचे
सुख चिंतिन
आयुष्याचे
सार्थक करेन
अंतःप्रेरणेची
साद जोवर
चालत
राहीन तोवर
वेदनांना
चिरा देऊन
सहवेदनांची
जाण ठेवून
प्रेमसुमनें
भरुन ओंजळभर
चालत
राहीन तोवर
जीवांत
जीव जोवर
चालत
राहीन तोवर
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
१८
नोव्हेंबर २०१९.
No comments:
Post a Comment