आला
पक्षी
गेला
पक्षी
इथला
पक्षी
स्थलांतर
पक्षी
वेगवेगळे
रंग
विविधांगी
नक्षी
कधी
बसतो फांदीवर
कधी
ऐटीत कारवर
कधी
बागडे अंगणी
ह्या
सा-यांस बघण्या
प्रभातीचा
ध्यास मनीं
दूर
रानीं मोर थुई थुई
तृणातून
वाजे कोल्हेकुई
पात्यांवर
डोले फुलपाखरु
त्यांसवे
उडे मनपाखरु
हरणांचे
कळप दिसे पुढे
काळवीटांचेही
दर्शन घडे
करडा
ससा हळूच डोकावे
बिळात
टुणकन् धावे
गायी,
बक-या, म्हशींना
काय
वेगळे नाव द्यावे?
माझ्या
पवन वाटिकेतले
सजीव
हे
डोळा
भरुनी रोज पाहावे
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
११
नोव्हेंबर २०१९.
No comments:
Post a Comment