अनाहूत
वेळ
बेसावध
मी
वेळी-अवेळी
ती
जागते आणि
जागविते
भावना
ती
अशीच अचानक येते
क्षणभरात
अगदी
किती
चित्रं दाखवते
सोबती
मला घेऊन
काळात
हरवूनी जाते
आयुष्य
त्या अरुणाचे
अलगद
डोळ्यांपुढे आणते
माझा
मामा गं तो
मी
तिला म्हणते
माहित
आहे मला
म्हणूनच
तुझ्याजवळ येते
तिच्या
चित्रपटांत
रुपे
त्याची किती मी बघते
शास्त्रप्रविण
तो वैज्ञानिक
विनोदवीर
तो मार्मिक
सहजकवी
की लेखक
विद्यार्थी
प्रिय शिक्षक
कोणते
रुप वाखाणावे
प्रश्नांत
मी पडते
पटत
नाही मनाला
त्याचे
आता नसणे
आठवणींच्या
पातळीवर
प्रत्यक्ष
त्याचे असणे
गेले
ते दिन गेले तरी
मन
भरुन पुन्हा येते
पुन्हा
पुन्हा ती येते
कापूसकोंड्याची
गोष्ट सांगते
आजोबांच्या
पुस्तकातून बोलते
'उद्या
लग्न आहे' म्हणते
आठवण
गाथा त्याची सकळ
माझी
मात्र रिक्त ओंजळ
तटस्थपणे
बघा कशी ती बघते
उष्णतेच्या
तकोट्यात कधी
कधी
थंड वा-याच्या झुळुकीत
आठवण
त्याची सुखावते
अलगद
मग ती उतरते
पापणींच्या
कडांवरती
भरले
नयन अश्रूंचे
सहज
वाहुनी जाते
ती
अशीच अचानक येते
ती
अशीच अचानक येते.
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
२५
नोव्हेंबर २०१९.
No comments:
Post a Comment