सातत्याने बदल हे तर विश्वरहस्य आहे. आजतागायत या बदलांमुळेच मानवी
मनावर खूप आघात झाले
आहेत. बदलण्याच्या, एकदम दृश्यात खूप
परिवर्तन करण्याच्या प्रक्रिया, दैवी शक्तींजवळ खूपच
कल्पक आहेत. माणसाचे एकाएकी, आजपर्यन्त या जगात वावरलेले
असतांना; एकदम निघून जाणे
ही तर विचारांना थांबविणारी
प्रक्रिया खूपच भंडावून सोडणारी
आहे, दुःखद आहे; आणि तरीही
माणसाला स्वतःविषयी विचार करायला लावणारी आहे.
श्रीयुत
नानासाहेब, श्री भूषण, सौ.
अपर्णा, सौ. कविता, सरिता
यांच्यावर विजयाताईंच्या जाण्यामुळे जी आपत्ती कोसळली
आहे, त्यांच्या त्या दुःखात आम्ही
सर्वजण सहभागी आहोत. अशा वेळी शब्दांनी
सांत्वन होत नसले तरी
शब्दांना पर्याय नाही. विजयाताई या अत्यंत प्रेमळ
व्यक्तित्त्वाच्या होत्या. शेवटपर्यन्त कार्यरत होत्या. आध्यात्मिक वृत्तीच्या होत्या. भजनी मंडळात जाणाऱ्या
होत्या, व्यायाम करणाऱ्या होत्या. ठिकठिकाणी प्रवास करुन सर्वांशी संपर्क
साधणा-या होत्या. सर्वांशी
आपुलकीने धागा जोडणा-या
होत्या. हा माझा वैयक्तिक
अनुभव आहे. चांगले आयुष्य
त्या जगल्या. सवाष्ण गेल्या ही सर्वात महत्त्वाची
गोष्ट आहे. नानासाहेबांची आता
फारच काळजी घ्यायला हवी.
असो.
'जाणे' हा अटळ सत्याचा
भाग आहे. दुःखाला समर्थपणाने
स्वीकारा. अजून काय लिहू?
संगीता
मुकुंद पाटखेडकर.
१६
नोव्हेंबर २०१९.
No comments:
Post a Comment