वाराही
आज मंद सारखा
चंद्राच्या
हवेत शिरशिरी का
फुलांनाही
भय काट्याचे का
हेमंत
ऋतुतला दिस आज वेगळा
का
जड
मनाला असा वाटे निसर्ग
दुःखी का
मायेची
ऊब कधी कुठे हरवली
का
कुणाचीही
असो आई ती आईच
ती
आज नाही हे मनाला
समजेल का
माझ्या
मनींचे असे खेळ हे
का
मनांस
कधी अटळ उत्तर मिळेल
का?
अधुरेपण
आईविना मन स्वीकारेल का
कुणाचीही
असो आई ती आईच
ती
आज नाही हे मनाला
समजेल का
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
१६
नोव्हेंबर २०१९.
No comments:
Post a Comment