झिंग, झिंग, झिंग,
झिंगाट करणारे जीवन सैराट,
सैरावैरा आणि विराट
अनुभवांचा आनंद देते.अनेकानेक व्यक्तित्वें या
जगाच्या पटावर येऊन गेलीत,
आहेत, आणि येतीलही.
जीवनाचा आदि-अंत
कळलाच नाही, नजरेच्या
टप्प्यात येतच नाही;
पण अननुभूत आनंद
देणाऱ्या कलाकृती आणि त्यांना
साकार करणारे कलाकार,
व्यक्तित्वाच्या उंचीने मान वर
करायला लावणारे महाभाग, व्यक्तित्वाच्या
खोलीने नतमस्तक होऊन वाकायला
लावणारे महापुरुष यांची कधीच
कमतरता पडणार नाही. यादी
फार मोठी आहे.
ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या
कुवतीने आस्वाद घ्यायचे ठरविले
तरी वेळ कसा
निघून गेला याचा
पत्ताही लागणार नाही.
'ही कुणी
छेडिली तार' लिहिणारे
ग.दि. माडगूळकर
अनेकांच्या हृदयाची तार छेडून
गेलेत. माझ्या लग्नानंतर जेंव्हा
आम्ही पहिल्यांदा नागपूरला
गेलो तेंव्हा मुकुंदरावांना
गाणे म्हणण्याचा आग्रह
झाला. गाणे हा
त्यांचा श्वास होता. कितीतरी
गीते त्यांना पाठ
होती. आवाजही सुंदर
होता. त्यांच्या आयुष्यात
त्यांनी गायनाची बक्षिसेही मिळविली
होती. त्यांनी 'ही
कुणी छेडिली तार'
हे ग.दि.
माडगूळकरांचे गीत म्हंटले
होते. 'इथेच टाका
तंबू' हे गाणे
मी त्यांच्या तोंडूनच
ऐकले होते. कितीतरी
सुंदर भावकाव्यांची ओळख
त्यांच्यामुळेच मला झाली.
काल कलर्स
मराठीवरचा ग.दि.माडगूळकरांवरचा कार्यक्रम बघताना रसिक
लोकांची मुळीच कमतरता नसल्याचे
जाणवले. कितीतरी कलाकारांना उपकृत
करुन ठेवणारी व्यक्तित्वें
अजरामर असतात. कलेचे माध्यम
विशेषतः गाणे लोकांच्या
मनात ठसते हे
अगदीच खरे आहे.
'माझे जीवन झाले
गाणे' म्हणण्याइतपत आयुष्य
आनंदित करण्याच्या दृष्टीने प्रत्येकाने
जर पाऊल उचलले
तर किती छान!
मुकुंदरावांनी माझे नाव
'संगीता' ठेवले. मी त्यांना
म्हणायची, 'मला तर
संगीताचा गंधही नाही.' त्यांनी
उत्तर दिले होते,
'तुला संगीत येवो
की न येवो
तो प्रश्नच नाही;
तू माझ्या जीवनाचे
संगीत आहेस.' उत्तर
आवडण्याजोगतेच होते.
असे आयुष्यातील
प्रसंग खूप बळ
देतात. कालचा कार्यक्रम पाहताना
मला सतत मुकुंदरावांची
आठवण येत होती.
त्यांना ती सर्वच
गीते तोंडपाठ होती.
आमच्या घरची सकाळ
नेहमीच गीतमय असे. अशा
लोकांना कसे विसरणार?
मुकेश, मन्ना डे,
किशोरकुमार आमच्या घरी नेहमीच
वास्तव्याला असत. दिलीपकुमार,
देव आनंद, राजकुमार,
राज कपूर त्यांच्या
सान्निध्यात असत. कलाकृती
माणसाला खूप उंचीवर
नेते. हा अनुभव
प्रत्येकालाच येतो; म्हणून कलाकृतींच्या
सान्निध्याने आयुष्याचा उजाळा वाढविण्याचा
आनंद घेणे आयुष्य
सुकर करण्याचा मार्ग
आहे.
संगीता पाटखेडकर.
१३ जून
२०१६.
No comments:
Post a Comment