Mumbo Jumbo= मूर्खपणाची धार्मिक श्रध्दा
किंवा क्रिया, अर्थशून्य
तंत्रमंत्र, अर्थशून्य भाषा या
गोष्टी निश्चितच स्वीकारायला नकोत.
ख-या सत्याला
डागाळणा-या या
गोष्टींचा अवलंब तर नकोच
नको. पण होते
काय की प्रत्येक
क्षेत्रात दांभिकपणाची बजबजपुरी माजली.
या दांभिकतेने 'सत्य'
कुठल्याकुठे अडगळीत जाऊन बसले.
सत्यम्, शिवम्, सुंदरम् या
तीन शब्दांचा अर्थ
कळेनासा झाला आहे.
जिथे अमृत आहे
तिथे विषही आहे.
जिथे लक्ष्मी आहे
तिथे अलक्ष्मीही आहेच.
एका नाण्याच्या दोन
बाजू असाव्यात तसे
हे परस्परविरोधी गुणधर्म
एकमेकांशी टक्करतात. शब्द, स्पर्श,
रुप, रस, गंध,
पाच कर्मेन्द्रिये, पाच
ज्ञानेन्द्रिये म्हणजे प्रपंच! जन्ममृत्यूच्या
आवर्तात जो सापडला
तो संसार! संसाराच्या
चक्रनेमिक्रमात गुंतणे हे स्वाभाविकच
पण त्यातून निघण्यासाठीची
धडपड, खटपट ही
सत्याच्या जवळ नेणारी
गोष्ट आहे; आणि
नेमका याचाच विसर
पडतो. जे सहजसाध्य
आहे त्यासाठी माणसाला
प्रयत्नांची काय आवश्यकता?
पण जे अप्राप्य
आहे त्यासाठी प्रयत्नच
करावे लागणार! हे
'अप्राप्य' दृष्टीच्या टप्प्यात येत
नाही. ते आणण्यासाठी
'Mastermind'(एखाद्या योजनेची आखणी व
मार्गदर्शन अत्यंत कुशलतेने, कल्पकतेने
करणारी व्यक्ती) असावे लागते.
त्याचा master stroke
masterpiece ठरु शकतो. अप्राप्याला हस्तगत
करण्यासाठी Doxology(ईश्वर स्तुतिपर गाणे
किंवा स्तोत्र) किंवा
Hagiography(संतचरित्र लेखन) यांचा अभ्यास
तर आवश्यक आहेच
पण एकाग्रता फार
मोठी गोष्ट आहे;
जी साधणे जवळजवळ
अशक्य आहे.
'करी सुखसंवाद
जो उगमाचा', वेदांचे
जे गुह्य, शास्त्रांचे
जे सार असलेले
'मनोपनिषद' म्हणजे मनाचे श्लोक
नुसते वाचून होणार
नाही तर 'Cynosure'(ज्याच्यावर
सर्वांचे लक्ष खिळले
आहे असा मनुष्य)
होणे तेव्हाच शक्य
होईल; एकाग्रतेने, elegant राहून
Merry-go-round प्रमाणे भराभर पुढच्या पुढच्या
पाय-या चढत
गेल्या पाहिजेत.
"पुण्याईचं दान घ्यावं
ओंजळ पसा
ब्रह्मानन्दी
जीव होई वेडा
की पिसा" - ही
अवस्था साधणे किती कठीण
आहे हे 'जावे
त्याच्या वंशा तेव्हा
कळे!
धर्म हा
प्रथम पुरुषार्थ. अर्थ
म्हणजे पैसा, भोगविलासी जीवन.
कामविलासी जीवनाचा अंगिकार म्हणजे
धर्मच्युति! विलासी जीवन म्हणजे
अनिश्चिती, दुःखाला आमंत्रण. काहीच
नित्य नाही ही
जाणीव होऊन आसक्ती
नाहीशी होण्याची अवस्था माणसाला
'धर्म' पुरुषार्थाकडे वळविते आणि निर्भय
बनविते. सत्यम्, शिवम्, सुंदराचा
खजिना हुडकायचा आहे.
अत्यंत नितळ मनाने
बघितले तर, तरच
ते रुप साक्षात
होईल!
निर्मळ नातेसंबंधात हा साक्षात्कार
होऊ शकतो. मग
ती आई असेल,
वडील असतील, बहीण-भावंडे असतील, पती,
पुत्र, कन्या असा कोणताही
संबंध असेल.
हा साक्षात्कार मला झालेला
आहे. तुम्हाला?.............
संगीता पाटखेडकर.
८/४/२०१६.
No comments:
Post a Comment