कदंब, पिंपळ, वड,
या झाडांची पाने,
समजा तुमचे डोके
दुखत आहे आणि
त्यावेळी तुम्ही नुसती हातात
जरी धरली तरी
डोकेदुखी नाहीशी करण्याचे सामर्थ्य
त्यात आहे हे
जाणवते. पानें, फुले, फळे
हे सर्व माणसाला
सतत चैतन्य देण्याचे
कार्य करीत असतात.
'प्राण' देणाऱ्या वनस्पती निसर्गात
आहेत; पण आपण
त्याचा पुरेसा उपयोग करण्याचे
विसरतोच विसरतो.
जास्वंदाच्या फुलात खूप चैतन्याचा
प्रादुर्भाव. गणपतीला अत्यंत प्रिय.
त्यानिमित्ताने का होईना
त्या फुलाला तुमच्या
हातांचा स्पर्श झाला तरी
शरीर खूप प्रसन्नत्वाने
भरुन जाते. बिल्वपत्र,
दुर्वा, पत्र्या, शमी, तुळस,
खूप निरनिराळ्या प्रकारची
फुले देवांना अर्पण
करण्याची पध्दत आहे. त्यानिमित्ताने
आपण निसर्गाच्या सान्निध्यात
राहावे व आपल्याला
चैतन्याचा स्पर्श व्हावा, झाडे
लावावीत व चैतन्यशक्तीचा
स्त्रोत निर्माण करावा अशी
इच्छा प्रत्येकाने ठेवावयास
हवी. वडाच्या झाडाची
पूजा वडसावित्री व्रताच्या
निमित्ताने स्त्रिया करतात. वडाचे
झाड दिर्घायुष्याचे प्रतीक.
स्त्रियांना त्यानिमित्ताने निसर्गाचा सहवास मिळतो.
व्रतही होते व
मनही प्रसन्न होते. एका
वडाच्या झाडात खूप मोठ्या
प्रमाणात प्राणवायूचा (अॉक्सिजनचा) साठा ठासून
भरलेला असतो. अशी अनेक
वडाची झाडे आजूबाजूला
असतील तर? पिढ्यान्पिढया
प्राणवायू मिळणार! आंबा हे
फळ अर्पण केले
जाते व आंब्याचे
आदान-प्रदान होते.
आंबा हे तर
अमृतफळ. फळांचा राजा. प्रत्येक
गोष्टीला आपल्या संस्कृतीत खूप
मानाचे स्थान आहे ते
यासाठीच!
लक्ष्मण बेशुध्द झाला
तेव्हा द्रोणागिरी हनुमंताने उचलून
आणला व नंतर
त्याच्यावरील योग्य त्या वनस्पतींचा
लेप लक्ष्मणाला लावण्यात
येऊन त्याच्यात चेतना
आली हे तर
सर्वश्रुतच आहे. अनेक
औषधी वनस्पतींचा उपयोग
आयुर्वेदात करण्यात येतो. पंचकर्म
उपचारपध्दती ही अत्यंत
प्रभावी उपाययोजना आहे. दुर्धर
रोगांवर अॉपरेशनचा इलाज होऊनही
बरेचदा अनेक समस्यांना
तोंड द्यावे लागते.
तिथे पंचकर्म उपचारपध्दती
खूप कार्यसिध्दी करुन
जाते असा अनेकांचा
अनुभव आहे. 'आजीबाईचा
बटवा' म्हणजे तरी
दुसरे काय आहे?
निसर्गाच्या अनुभवातून, शोधातून
वनस्पतींचे गुणधर्म शोधणारे ऋषी
मुनी हे अनेकांचे
प्राण वाचविणारे 'संजीवक'
या संजीवनीच्या भरवशावरच
तर ठरले!
'झाडे लावा,
झाडे जगवा' आज
सांगावे लागत आहे.
त्यादृष्टीने अनेकजण प्रयत्नरतही आहेत.
'पाणी' ही समस्या
निर्माण होण्याचे मुख्य कारण
बेजबाबदारपणे झालेली वृक्षतोड आहे.
'माती' चे महत्त्व
नाहीसे होऊन सिमेंटकाँक्रीटचे
साम्राज्य स्थापन झाले आणि
पाणी वाचविणे कठीण
झाले. आज जागृतीचे
प्रयत्न केले जात
असले तरी 'उशीरा
ज्ञान सदा येते'
असे झाल्यामुळे परिस्थिती
आटोक्याबाहेर गेली आहे.
माणसाची 'बेजबाबदार वृत्ती' जोपर्यंत
बदलणार नाही तोपर्यंत
अनेक समस्या निर्माण
होतच राहणार!
आधुनिकतेच्या विळख्यात गुरफटलेला माणूस
पर्यावरणाचा -हास होतो
आहे हे विसरतो
आहे. पर्यावरण हा
माणसाचा प्राण आहे. त्याची
निगा राखण्याची आवश्यकता
प्रत्येकाने लक्षात ठेवावयास हवी
आणि निसर्गाची जोपासना
प्रत्येकाने करावयास हवी. 'जीवो
जीवस्य जीवनम्' हा न्याय
माणसाच्या बाबतीतही लागू आहेच.
पर्यावरण राखाल तरच जगणार
ना!
"वृक्षवल्ली आम्हां सोयरी
वनचरें l
पक्षिणी सुस्वरें आळविती"
ll - तुकाराम
ऋषीमुनींचा आहार म्हणजे
कंदमुळे आणि फळे.
दीर्घायुष्याची सिध्दी त्याद्वारेच त्यांना
प्राप्त होत होती.
"कांदा - मुळा - भाजी,
अवघी विठाबाई माझी"
- म्हणणारा सावता माळी आठवून,
प्रत्येक गोष्टीचे महत्त्व आहारात
किती आहे आणि
त्यातच देवरुप पाहण्याचा प्रयत्नही
लक्षात घ्यावयास हवा. माणसाने
पूर्वापार निसर्गाचा अभ्यास करुनच
काही आडाखे बांधले.
असा शोध घेणाऱ्यांचे
ऋणही मानावयास हवे.
सगळे विश्व
अनुभवांची समृध्दी वाढविणारी पाठशाळा
आहे. दत्ताने २४
गुरु केले. आपल्याला
तर जिथे जिथे
काही घेण्याजोगते
आहे तिथून तिथून
त्याचे ज्ञान मिळविण्यासाठी अनेकानेक
गुरु करण्याची आवश्यकता
आहे. विषयांचीही कमतरता
नाही आणि ज्ञान
तर प्रत्येक क्षेत्रात
अपरंपार आहे. वनस्पतिशास्त्र
असो की जीवशास्त्र,
खगोलशास्त्र असो की
मानववंशशास्त्र; प्रत्येक ज्ञान परस्परांशी
संबंधित आहे. सारा
जन्म ज्ञानाचा पाठपुरावा
करणारे लोक आहेत.
त्यांच्याच ज्ञानलालसेने आपण इथपर्यंत
येऊन पोहोचलो आहोत.
ज्ञानाने माणूस जास्तीतजास्त साक्षेपी,
विवेकी आणि पारखी
होतो. 'Discretion is the
better part of Valour.'
पानें, फुलें यांचे
आयुष्य किती क्षणभंगुर
असते पण त्यातही
ते जास्तीतजास्त सर्वांना
आनंद देण्याचा प्रयत्न
करतात. यातून शिकण्याजोगे खूपच
आहे. माणूस जन्माला
आल्यानंतर त्याच्या कुटुंबातून त्याच्यावर
बरेच संस्कार झालेले
असतात पण तेवढ्यानेच
त्याचे आयुष्य घडते असे
नाही. ज्या ज्या
वातावरणाशी मनुष्याचा संबंध येतो
तेथून तेथून त्याच्यावर
प्रभाव पडत असतो.
कोणत्याही एका व्यक्तीचे
ऋण मानून भागणार
नाही. विश्वातील प्रत्येक
वस्तू आणि व्यक्ती
महत्त्वाची आहे. सर्वांचा
ऋणभार आपल्यावर असतो;
ही जाणीव विश्वात्मकतेकडे
जाण्यासाठी अत्यंत आवश्यक असते.
जास्वंदाचे फुल केवळ
स्पर्शाने शरीरातील उष्णता कमी
करते. मोग-याचे
फुल आणि वाळा
अक्षय्यतृतीयेला आवर्जून वापरतात कारण
सुगंधाबरोबरच उष्णतेला मारक या
गोष्टी आहेत. दुर्वांचा रस
पिऊन पोषण करणारी
कुटुंबे इतिहासात होऊन गेल्याच्या
कथा आपण वाचतोच.
बेलाच्या फळाचा मुरब्बा पोटासाठी
खूप चांगला असतो.
पानाफुलांचे तोरण आणि
वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांनी केलेली
आरास व सजावट
घरांचे सौंदर्य तर वाढवतेच
पण मानवाची ऊर्जा
वाढविते हे आपल्या
लक्षात येत नाही.
विश्वातील प्रत्येक व्यक्ती,
वस्तू आपल्या उत्कर्षासाठी
निर्माण झालेली आहे. चांगल्यातले
चांगले ग्रहण करावयाचे व
वाईटाचा छंद सोडून
द्यायचा हा साक्षेप
तेव्हाच येतो जेव्हा
प्रत्येक व्यक्ती, वस्तू यांचे
निरीक्षण बारकाईने केले जाईल
तेव्हाच! जीवनाची कर्मशीलता माणसाला
जीवनाच्या शिखरावर नेऊन पोहोचविते.
'न हि
ज्ञानेन सदृशं पवित्रमिह विद्यते'
हेच खरे!
सगळे सुरळीत
चालू असले की
माणसाचा विकास खंडित होतो.
विरोधी घटनांनी अडथळा वाटला
तरी त्या घटना
अनेक आडवळणी बाजूंचा
विचार करायला भाग
पाडतात. कोणतेही कथानक विरोधी
बाजूंशिवाय पुढे सरकत
नाही. संवाद - विरोध
- समतोल ही कलाकृतीची
सौंदर्यतत्वे माणसाच्या जीवनाला तर
अधिकच प्रकर्षाने लागू
पडतात; कारण साहित्यकृतींच्या
आधी मानवी जीवन
आहे. जीवनाभ्यासातूनच कलाकृती
निर्माण होतात.
जीवन संकीर्ण,
गुंतागुंतीचे, अडथळे, आपदा, विरोध
आणि संकटे यांनी
व्याप्त आहे, त्यामुळे
त्याकडे दुराग्रहाने न बघता
आपल्याला मदतनीस म्हणून बघितले
तर अनेकानेक मार्ग,
पर्याय, आपल्याला खुणावतात. एक
द्वार बंद झाले
तर १० द्वारे
खुली होतात, म्हणतात
ना, त्याचे सार
हेच आहे.
'Necessity is the mother of invention' - ही गरज
निर्माण होणे आवश्यक
आहे; तरच माणूस
मार्ग शोधतो आणि
त्याला आयुष्याचा शोध लागतो.
वाटा सुकर होतात.
कुंतीने कृष्णाची आठवण
सतत यावी म्हणून
नेहमी दुःख दे,
म्हणून कृष्णाला विनवणी केली
होती. या कथा
खूप काही सुचवून
जातात.
संगीता पाटखेडकर.
१५/५/२०१६.
No comments:
Post a Comment