जिव्हाळ्याचं,
वात्सल्याचं, ममतेचं निःस्वार्थी रुप
म्हणजेच आई! प्रत्येक
व्यक्तीला विविध नात्यांतून प्रेम
मिळत असतं; पण
प्रेमाचा आणि फक्त
प्रेमाचाच निरपेक्ष वर्षाव करणारं
एकच नातं आणि
त्या नात्याचं एकच
रुप असतं मातेचं.
या प्रेमाला जो
पारखा होईल तो
स्वतःलाच दुर्भाग्यशाली समजतो. आम्ही तिन्ही
भावंडे या प्रेमाच्या
बाबतीत खूप भाग्यवान.
आईच्या मायेच्या पंखाखाली आमची
जडणघडण झाली. माझी आई
पूर्वाश्रमीची कु. गीता
सदाशिव मोहरीर. लग्नानंतरची संगीता
मुकुंद पाटखेडकर.
पूर्वाश्रमीची गीता; आजी-आजोबांनी
तिच्यावर केलेल्या उच्च दर्जाच्या
संस्कारात वाढली. आई आणि
वडील हेच तिचे
प्रथम गुरु. आजोबा
शाळेत शिक्षक असल्यामुळे,
त्यांचे मराठी भाषेवर प्रभुत्व
असल्यामुळे, आईवर त्यांच्या
एकूणच व्यक्तिमत्त्वाचा, भाषेचा
ठसा उमटला. तिची
शैक्षणिक प्रगती विलक्षण, उल्लेखनीय
आणि असामान्य होती.
माहेरी सर्वात मोठी मुलगी
असल्याने तिच्यावर अनेक कामांची
जबाबदारी आली. घरातील
कामे करता करता
नेटाने तिने अभ्यास
करुन शैक्षणिक क्षेत्रात,
शालेय आणि महाविद्यालयीन
स्तरावर अनेक पुरस्कार
मिळविले, शिष्यवृत्ती मिळविल्या. त्याकाळी
होणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये जसे-
शुध्दलेखन, वादविवाद, समयस्फूर्त, पाठांतर
या सर्वच क्षेत्रात
ती अव्वल असायची.
Extra curricular
activities मध्येही ती माहिर
होती. जसे रांगोळी
काढणे, खेळणे. खो-खो
टीमची ती captain होती.
ती M.A. पर्यंत शिकली. नागपूर
विद्यापीठातून M.A. ला दुसरी
मेरिट आली. लग्नाआधी
सात वर्षे तिने
एकटी राहून Lecturership केली.
ती विद्यार्थीप्रिय शिक्षिका
होती. शैक्षणिक रुपातील
'ती' या विविध
सुवर्णालंकारांनी नटलेली होती.
६ जून १९७५
साली बाबांसोबत(मुकुंद
पाटखेडकर) तिचा विवाह
झाला आणि ती
गीताची संगीता झाली.
'पानी तेरा
रंग कैसा? जिसमें
मिलाया वैसा' या म्हणीप्रमाणे
ती संसारात समरसून
गेली. आपण सध्या
जिथे आहोत तिथलेच
होऊन जाणे हे
आणखी एक तिचे
वैशिष्टययुक्त रुप! मी
जवळून पाहिलेले आणि
अनुभवलेले तिचे पतिव्रतेचे
रुप! बाबांनी काही
कौटुंबिक कारणांमुळे तिला नोकरी
सोडायला लावली. तिने सहज
सोडली. कोणत्याही गोष्टीचा सहज
त्याग, कुठलाही खेद, विषाद
न मानता ती
करु शकते! अगदी
नावाप्रमाणेच मोहरीरांची गीता! 'कर्मण्येवाधिकारस्ते
मा फलेषु कदाचन.
या गीतेतील तत्वाशी
प्रामाणिक राहून कर्तव्य बजावित
राहणे आणि समोर
येईल त्या दुःखाला,
संकटांना धीरोदात्तपणे सामोरं जाणारं तिचं
कर्तव्यनिष्ठ, त्यागी, आत्मसन्मानी रुप! सासरची-माहेरची, शेजारची, एकूणच
संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना
समान न्याय आणि
सख्य देणारं रुप!
स्वयंपाक करण्यात सुगरण! कला,
संगीत, नाट्य, चित्रपट, क्रीडा
या सर्वच कलांचा
आस्वाद घेणारं तिचं कलासक्त
रुप! कोणतेही कार्य
अगदी मन लावून
पार पाडण्याची तिची
वृत्ती! कोणत्याही व्यक्तीमध्ये दोष
न पाहता त्यांच्यातील
गुण बघण्याचे आणि
ते आत्मसात करण्याचे
तिचे गुणग्राहक रुप!
तिचे मोठे डोळे
आणि लांबसडक सुंदर
केस हे तिचं
सौंदर्यस्वरुप! सत् चित्
आनंदावरची तिची निष्ठा.(सत्यम् शिवम् सुंदरम्')
दोनदा अमेरिकेला जाऊन तेथील
सगळ्या आनंदाचा आस्वाद तिने
घेतला. तिला आनंदाचा
शोध घ्यावा लागत
नाही. तो तिच्या
आसपासच वास्तव्य करुन असतो.
कामाचा ऊत्साह दांडगा. ७१
पूर्ण झाले असतांनासुध्दा
कामाचा वेग भारी!
वाचन दांडगे! लिखाण
दांडगे! कोणत्याही विषयावर सहज
लिहिण्याची तिची हातोटी!
स्मृती तल्लख! अॉगस्ट २०१५
ते जुलै २०१६
या कालावधीत जवळजवळ
शंभरच्या वरचे लेख
तिने लिहिले आहेत.
अमोलने तिचे लिखाण
Blog वर घेतले आहे. Blog ची
लिंक आहे, http://patkhedkarvishwa.blogspot.in
तिचे लिखाण वाचल्यानंतर भाषेची
समृध्दी आपोआपच वाढली. प्रत्येक
लेख अनोखा आहे.
टी.व्ही. पाहतांना,
स्वयंपाक करतांना, कुणाचीही बडबड
चालू असतांना तिची
लेखणी तुरुतुरु धावत
असते. लेखनातील तुर्यावस्था
तिने साधली आहे.
इंटरनेटचा कुठलाही आधार न
घेता तिने विविध
विषयांवर लेख लिहिले.
तिचे लिखाण अनेकांना
पाठविण्यात आले व
त्यांना ते आवडलेही! असे
हे आईचे साहित्यिक,
बौध्दिक, लेखिकेचे रुप!
माझी आई बहुआयामी
व्यक्तित्वाची धनी आहे
याचा मला सार्थ
अभिमान आहे.
मृदुला मुकुंद पाटखेडकर.
६ जुलै
२०१६.
No comments:
Post a Comment