माणसाला डोंगराच्या शिखरावर
दोन मार्गांनी जाता
येते. डोंगराच्या सभोवती
प्रदक्षिणा करीत करीत
व पुष्कळ नागमोडी
वळणे घेत घेत!
असल्या रस्त्याचा चढाव बेतशीर
असतो, पण पल्ला
जास्त लांबीचा होतो.
वळणे घ्यावयाची नाहीत,
सरळ रेषेने तडक
वर चढावयाचे, दर
पावलागणिक जास्त उंची गाठावयाची
हाही एक मार्ग.
येथील चढाव उभंटा
असतो व श्रम
जास्त पडतात. स्नायू
बळकट, चढून जाण्याची
मेहनत आणि लवकर
प्रवास संपविण्याचा निश्चय या
गोष्टी ज्यांच्यात असतील त्यांना
हा उभ्या चढावाचा
मार्ग जमतो.
माणसाच्या उत्क्रांतीचे असे
दोन मार्ग आहेत.
१) पिपीलिका मार्ग
२) विहंगम मार्ग.
पिपीलिका मार्गे हळूहळू घडे
l विहंगमे फळासि गाठी पडे
l - दासबोधः- २०, २,
१० - रामदास. महाराष्ट्रातील
संतांनी आपली सार्वजनिक
चळवळ जरी पिपीलिका
मार्गाने जाणाऱ्या बहुजनांकरिता केली
असली तरी ते
स्वतः विहंगम मार्गाने
जात होते.
जगातील सर्व धर्मात
काही भाग बहिरंगाचा
असतो व काही
अंतरंगाचा! बहिरंगाचा सोपा व
सर्वांकरिता; अंतरंगाचा गहन व
फक्त अधिकारी माणसांकरिता!
धर्मातील महाज्ञानी माणसांना, अंतरंगाचा
भाग अवगत असतो
व तो फक्त
योग्य माणसांनाच उपलब्ध
व्हावा अशी योजना
असते. महाज्ञानी माणसांचे
संप्रदाय असतात. विशिष्ट योग्यतेची
माणसे त्या संप्रदायात
शिरावी व तेथे
त्यांस त्या अधिकारी
माणसाकडून ते अंतरंगाचे
गुप्त ज्ञान मिळावे
अशी व्यवस्था असते.
निवृत्तीनाथांच्या पाठीमागे एक वाघ
लागला आणि तो
त्यांना गहिनीनाथांपर्यंत घेऊन आला.
गहिनीनाथांनी निवृत्तीला सिध्द केले
व 'निवृत्ती' ज्ञानेश्वरांचे
गुरु बनले. ज्ञानेश्वरांकडून
जे कार्य करावयाचे
ते करवून घेतले.
दत्त संप्रदायात - दत्त
हे स्वतः अनेकांचे
मार्गदर्शक बनले. दत्तात्रेय हे
माहूरगडावर समर्थ रामदासस्वामींना दर्शन
देते झाले असा
इतिहास आहे. एकनाथही
दत्तसंप्रदायी होते. जनार्दनस्वामींचे ते
शिष्य होते.
अधिकार तैसा करु
उपदेश l साहे ओझे
त्यास तेचि द्यावे
l मुंगीवरी भार गजाचे
पालाण (खोगीर) घालिता ते
कोण कार्यसिध्दी! - तुकाराम
गाथा, आवटे क्रमांक
३५०४, जोग क्रमांक
२४६०. धर्मामध्ये जो
अंतरंगाचा भाग आहे
त्यात योगसिध्दीचा समावेश
होतो.
गाढवभरी पोथ्या उलथिशी
पाने l परि गुरुगम्य
खुणे नेणशी बाप्पा
l - आवटेकृत तुकाराम गाथा क्र.
४३४१.
कोठल्यातरी उच्च अशा
कोठारातून आपण आपले
ज्ञान आणले आहे,
ती स्वतःची स्वतंत्र
कमाई नाही असे
संत वारंवार सांगतात.
करितो कवित्व म्हणाल
हे कोणी l नव्हे
माझी वाणी पदरीची
l माझिये युक्तीचा नव्हे हा
प्रकार l मज विश्वंभर
बोलवितो l - जोग यांची
तुकारामांची गाथा - ६०५.
संत आपल्या
हृदयातील जाणिवेच्या उच्च उच्च
पाय-या चढत,
तेथील अनुभवांचे सहजोद्गार
त्यांच्या मुखाने बाहेर पडत
व ते दुसऱ्या
कोणास तरी टिपून
घ्यावे लागत. तुकारामांचे सहजोद्गार
संताजी जगनाडे टिपीत असत.
रामदासांचे लेखक कल्याण
होते. ज्ञानेश्वरांचा लेखक
चिदानंदबोवा, निवृत्तीनाथांचे बोल सोपानदेव
लिहून घेत. मुक्ताबाईची
वचनें स्वतः ज्ञानेश्वर
टिपीत. सावता माळी व
चोखामेळा यांचे लेखक अनुक्रमे
काशिबा गुरव व
अनंत भट हे
होते. केळे खाताना
आपण जशी त्याची
साल काढून टाकतो
तशी अध्यात्मग्रंथाची शब्दरुपी
साल काढून टाकून
आपण त्यातला अर्थ
ग्रहण केला पाहिजे.
पूर्वी पाश्चात्त्य मानसशास्त्रज्ञांना
वाटे की जागेपणी
माणसाची जी जाणीव
असते तितकीच तिची
मर्यादा होय. पण
अलीकडे हिप्नॉटिझम, स्वप्नें, मनाचे
रोग वगैरेंचे संशोधन
करुन माणसाच्या जाणिवेला
दोन दालने असतात
असे ते म्हणू
लागले आहेत. जागृत
जाणीव - Conscious Mind (पहिले दालन), Sub-Liminal Consciousness (दुसरे दालन).
उपनिषदांच्या व योगशास्त्राच्या
वाङमयात माणसाच्या जाणिवेबद्दल अधिक
माहिती आहे.
सामान्य प्रतीचा माणूस
जागृत स्थितीत असताना
दृश्यदेहाने भूलोकांत नाना व्यवहार
करतो. फक्त पाच
ज्ञानेन्द्रियांचा व पाच
कर्मेन्द्रियांचा त्याचा दृश्य देह
कार्यक्षम झालेला असतो. माणसाला
आणखी दुसरे देह
आहेत. कोणी त्यांना
प्राणमय कोष, मनोमय
कोष वगैरे नावे
देतात. कोणी त्यांना
सूक्ष्म देह, कारण
देह अशी नावे
देतात. दोन महिन्याच्या
लहान अर्भकाचा देह
जसा क्रियाशून्य असतो;
तसे सामान्य माणसांचे
हे इतर देह
क्रियाशून्य असतात. लहान अर्भकाची
टाळू भरलेली नसते.
त्याला पक्वान्नें पचत नाहीत.
त्याला हात, पाय
असले तरी हाताने
जिन्नस उचलता येत नाही.
पायाने चालता येत नाही.
जीभ असली तरी
बोलता येत नाही.
सामान्य माणसांचे जे दुसरे
देह असतात ते
असल्या बालदेहाप्रमाणे असमर्थ असतात; त्यामुळे
सामान्य माणसाला जाणिवेच्या वरच्या
मजल्यावर चढून तेथील
ज्ञान मिळविता येत
नाही व तेथे
व्यवहार करता येत
नाही. वरच्या भूमिकेवरचे
ज्ञान उच्च प्रकारचे
असते. तेथे जो
व्यवहार होतो तोही
उच्च प्रकारचा असतो.
विहंगम मार्गाला जो माणूस
लागला त्याला हे
उच्च ज्ञान मिळविणे
अवश्य असते; त्यासाठी
त्याला स्वतःचे अदृश्य देह
कार्यक्षम करावे लागतात.
तुकाराम म्हणतात 'अणुरणीया
थोकडा l तुका आकाशाएवढा
l गिळोनि सांडिले कळिवर l भवभ्रमाचा
आकार l संकोचोनि काय l झालासि
लहान l घेई आपोशन
ब्रह्मांडाचे' l रामदास सांगतात - 'मनें
अंतरिक्ष जावे l क्षण एक
ब्रह्मचि व्हावे पुनः तेथून
कोसळावे l वृत्तिवरी मागुते'
ध्यानाचा प्रयत्न करुन
थोडा वेळ तरी
वर जा; मग
पुन्हा जाणीव कोसळली तरी
चालेल. ज्ञानेश्वरांचे अनेक उद्गार
याच धर्तीचे आहेत.
'मोहरले मोहरले l मन माझे
मोहरले l भक्ति फळासि कैसे
l आले गे माय!
ज्ञानदेवा ब्रह्म लाधले अवचट
l उन्मनीचा घाट चढताची'
l तुर्येमध्ये माझा अखंड
रहिवास, असे ज्ञानेश्वर
म्हणतात.
जनाबाईने स्वतःसंबंधाने म्हंटले
आहे -
'एकटी तू
गाणे गासी l दुजा
शब्द उमटे पाशी
l कोण गे तुझ्या
बरोबरी l गाणे गाती
निरंतरी l स्वर देवाचा
उमटला l दासी जनीने
ओळखला' l - असे ती
म्हणते. अध्यात्म प्रगतीसाठी गुरुशिष्यांच्या
ज्या गाठीभेटी होत
त्यापैकी एका भेटीचे
वर्णन ज्ञानेश्वरांनी केले
आहे. 'भेटली मुक्ताबाई
गोरोबाला' ते वर्णन
असेः-
मोतीयांचा चुरा फेकला
अंबरी l विजूचीया परी कीळ
(तेज) झाले ll१ll
जरी पीतांबरे
नेसविली नभा l चैतन्याचा गाभा
नील बिंदु ll२ll
तळी परी
पसरे शून्याकार झाले
l सर्पाचीही पिलें नाचू लागे
ll३ll
कडकडोनि वीज निमाली
ठायीचे ठायी l
भेटली मुक्ताबाई गोरोबाला
ll४ll
ज्ञानदेव म्हणे कैसी
झाली भेट l ओळखिले
अविट आपुलेपण ll५ll
या भेटीत
गोरोबांना स्वतःच्या ख-या
स्वरुपाची ओळख पटली.
अदृश्य सृष्टीतील एका मनोहर
दृश्याचे हे वर्णन
आहे असे जर
आपण लक्षात घेतले
नाही तर ते
मूर्खपणाचे वाटेल.
अध्यात्ममार्गावर बरीच प्रगती
झालेला जो गुरु
असतो त्याच्या दृश्य
देहाभोवती सूक्ष्म देहाचे भले
मोठे वर्तुळाकार आवरण
असते. त्यात नाना
रंगाच्या सुंदर लकेरी एकसारख्या
झळकत असतात. शिष्याच्या
सूक्ष्म देहाचे जे वर्तुळाकार
आवरण असते ते
गुरुच्या मानाने लहान व
तेजस्वितेत कमी असले
तरी तेही चकाकत
असते. ही दोन
माणसे एकमेकांजवळ आली
की ज्याला सूक्ष्म
दृष्टी असेल त्याला
प्रकाशाचे हे दोन
गोळे परस्परात मिसळल्याची
अवर्णनीय शोभा दिसते.
असल्या प्रसंगात गुरुच्या सूक्ष्म
देहातील द्रव्याचे स्पंद शिष्याच्या
सूक्ष्म देहावर परिणाम करुन
त्याची संस्कारक्षमता वाढवितात आणि शिष्याच्या
मनाला जाणिवेच्या वरच्या
पाय-या चढण्याच्या
कामी साह्य करतात.
माणूस जेव्हा नेहमीच्या
मनःस्थितीत असतो तेव्हा
तो द्वैताच्या साम्राज्यात
असतो. तो स्वतःला
'मी' म्हणतो. तो
एखाद्या झाडाकडे पाहतो तेव्हा
तो द्रष्टा असतो;
त्याची पाहण्याची वस्तू जे
झाड ते दृश्य
असते. हे झाड,
हे दृश्य 'मी'
नव्हे हे त्याचे
मन त्याला सांगते
पण माणसाच्या मनाची
अशी एक उच्च
अवस्था आहे की
त्या अवस्थेत द्वैत
मावळते. झाड हे
वेगळी जिन्नस आहे
असा अनुभव त्याला
येत नाही, तर
तो 'मी' चाच
एक भाग आहे
असा अनुभव येतो.
झाडावर कोणी घाव
घातला तर नेहमीच्या
स्थितीत असताना, हा घाव
त्याला दुरुन दिसेल पण
या अवस्थेत गेल्यावर
झाडावरचा घाव हा
आपल्या स्वतःवर पडलेला घाव
आहे असा त्याला
अनुभव येतो. माणसाला
त्या ऐक्याचा अनुभव
येण्यासाठी लिंगदेह विस्कटून टाकणे
जरुर असते. मुकुंदराज
त्याला कारण शरीर
म्हणतात. थिअॉसफीय वाङमयातही कारण
शरीर हेच नाव
असून इंग्रजी संज्ञा
- Casual Body अशी आहे. 'लिंग
देहभंग जव झाला
नाही l तोंवरि बा पाही
मुक्ति कैची' - असे ज्ञानेश्वरांनी
म्हंटले आहे. 'आनंदवनभुवन' नामक
रामदासांनी एक 'स्फुट'
लिहिले आहे. ते
सुंदर तर आहेच!
रामदासांच्या धीट वाणीचे
दर्शन करुन देणारे
पण वाचल्यानंतर वरवरचा
अर्थ न घेता
शिवाजी महाराजांना योग्य अर्थ
कळेल अशा पध्दतीने
शब्दयोजना केल्याचे जाणवते. समर्थांना
पुढील घटनांचा साक्षात्कार
आधीच झाला होता
हेही जाणवते.
जन्मदुःखे
जरादुःखे l नित्य दुःखे पुन्ह
पुन्हा l संसार त्यागणे जाणे
l आनंदवनभुवना ll१ll वेधले
चित्त जाणावे l रामवेधी
निरंतरी रागे हो
वीतरागे हो l आनंदवनभुवना
ll२ll संसार वोढिता
दुःखे l ज्याचे त्यासीच ठाऊके
l परंतु एकदा जावे
l आनंदवनभुवना ll३ll
न सोसे दुःख
ते होते l दुःख
शोक परोपरी एकाकी
एकदा जावे आनंदवनभुवना
ll४ll कष्टलो, कष्टलो
देवा l पुरे संसार
जाहला देहे त्यागासि
येणे हो l आनंदवनभुवना
ll५ll जन्म ते
सोसिले मोठे l अपाय बहुतां
परी l उपायें धाडिले
देवें l आनंदवनभुवना ll६ll स्वप्नीं
जे देखिले रात्री
l तें तें तैसेचि
होतसे l हिंडता फिरता गेलो
l आनंदवनभुवना ll७ll हे
साक्ष देखिली दृष्टी
l किती कल्लोळ ऊठिले l विघ्नघ्ना
प्रार्थिले गेलो l आनंदवनभुवना ll८ll
स्वधर्माआड जे विघ्नें
l तें तें सर्वत्र
ऊठिली लाटिलीं कूटिली
दैवें l दापिली कापिली बहु
ll९ll विघ्नाच्या ऊठिल्या
फौजा l भीम त्यावरि
लोटला घर्डिली चिर्डिली
रागे l रडविली, बडविली बळें
ll१०ll हांकिली, टाकिली, तेणें
l आनंदवनभुवनी हांक बोंब
बहु झाली l पुढे
खत्तल्ल मांडिले ll११ll खेळले
लोक देवांचे l मुख्य
देवचि ऊठिला कळेना
काय रे होते
l आनंदवनभुवनी ll१२ll स्वर्गीची
लोटली जेथे l रामगंगा
महानदी तीर्थासी तुळणा नाही
l आनंदवनभुवनी ll१३ll ग्रंथी
जे वर्णिली मागे
l गुप्त गंगा महानदी
जळांत रोकडे प्राणी
l आनंदवनभुवनी ll१४ll सकळ
देवांची साक्षी l गुप्त ऊदंड
भुवने l सौख्यचि पावणे जाणे
l आनंदवनभुवना ll१५ll त्रैलोक्य
चालिले तेथे l देव, गंधर्व
मानवी l ऋषी, मुनी,
महायोगी l आनंदवनभुवनी ll१६ll "अक्रा, अक्रा"
बहू अक्रा l काय
अक्रा कळेचिना l गुप्त
ते गुप्त जाणावे
l आनंदवनभुवनी ll१७ll त्रैलोक्य
चालिल्या फौजा l सौख्य बंध
विमोचने l मोहीम मांडिली मोठी
l आनंदवनभुवनी ll१८ll सुरेश
ऊठिला आंगे l सुरसेना
परोपरी विकटे, कर्कशें, यानें
l शस्त्रपाणी महाबळी ll१९ll देव
देव बहू देव
l नाना देव परोपरी
दाटणी जाहली मोठी
l आनंदवनभुवनी ll२०ll दिग्पती
चालिले सर्वे l नाना सेना
परोपरी वेष्टीत चालिले सकळै
l आनंदवनभुवनी ll२१ll मंगळें
वाजती वाद्ये l महागण
समागमें आरंभी चालिला पुढे
l आनंदवनभुवनी ll२२ll राशभें
राखिली मागे l तेणें रांगेचि
चालिला सर्वत्र पाठिसी फौजा
l आनंदवनभुवनी ll२३ll अनेक
वाजती वाद्यें l ध्वनी
कल्लोळ ऊठिला l छेबीने डोलती
ढाला l आनंदवनभुवनी ll२४ll विजयी
दीस जो आहे
l ते दीसीं सर्व
ऊठती l अनर्थ मांडला मोठा
l आनंदवनभुवनी ll२५ll देवची
तुष्टला होता l त्याचे भक्तीस
भुलला मागुता क्षोभला
दुःखे l आनंदवनभुवनी ll२६ll कल्पान्त
मांडला मोठा l म्लेंछ दैत्य
बुडावया l कैपक्ष घेतला देवीं
l आनंदवनभुवनी ll२७ll बुडाले
सर्वही पापी l हिंदुस्थान बळावले
अभक्तांचा क्षयो झाला l आनंदवनभुवनी
ll२८ll पूर्वी जे मारिले
होते l तेची आता
बळावले कोपला देव देवांचा
l आनंदवनभुवनी ll२९ll त्रैलोक्य
गांजिले मागे l ठाऊकें विवेकी
जना l कैपक्ष घेतला
रामें l आनंदवनभुवनी ll३०ll भीमची
धाडिला देवें l वैभवे धाव
घेतली लांगूळ चालिले
पुढे l आनंदवनभुवनी ll३१ll येथून
वाढला धर्मुं l रमाधर्म
समागमें l संतोष मांडला मोठा
l आनंदवनभुवनी ll३२ll बुडाला
औरंग्या पापी l म्लेंछ संहार
जाहला l मोडली मांडली छत्रें
l आनंदवनभुवनी ll३३ll बुडाले
भेदवाही ते l नष्ट
चांडाळ पातकी ताडिले पाडिले
देवें l आनंदवनभुवनी ll३४ll गळाले,
पळाले, मेले l जाले देशोधडी
पुढें निर्मळ जाहली
पृथ्वी l आनंदवनभुवनी ll३५ll उदंड
जाहले पाणी l स्नानसंध्या
करावया जप, तप,
अनुष्ठानें l आनंदवनभुवनी ll३६ll नाना
तपें, पुरश्चरणें l नाना
धर्म परोपरी गाजली
भक्ती हे मोठी
l आनंदवनभुवनी ll३७ll लिहीला
प्रत्ययो आला l मोठा आनंद
जाहला l चढता वाढता
प्रेमा l आनंदवनभुवनी ll३८ll बंड
पाषांड ऊडाले l शुध्द आध्यात्म
वाढले l राम कर्ता
राम भोक्ता l आनंदवनभुवनी
ll३९ll देवालयें, दीपमाला l रंगमाळा
बहुविधा पूजिला देव देवांचा
l आनंदवनभुवनी ll४०ll रामवरदायिनी
माता l गर्द घेऊनी
ऊठिली मर्दिले पूर्वीचे
पापी l आनंदवनभुवनी ll४१ll प्रत्यक्ष
चालिली, राया l मूळमाया समागमें
नष्ट चांडाळ ते
खाया l आनंदवनभुवनी ll४२ll भक्तांसी
रक्षिले मागे l आता ही
रक्षिते पहा भक्तांसी
दीधले सर्वै l आनंदवनभुवनी
ll४३ll आरोग्य जाहली काया
l वैभवें सांडिली सीमा l सारसर्वस्व
देवांचे l आनंदवनभुवनी ll४४ll देव
सर्वस्व भक्तांचा l देव, भक्त
दुजे नसे संदेह
तुटला मोठा l आनंदवनभुवनी
ll४५ll देव, भक्त
येक जाले l मिळाले
जीव सर्वही संतोष
पावले तेणे l आनंदवनभुवनी
ll४६ll सामर्थ्ये यश कीर्तीची
l प्रतापें सांडिली सीमा l ब्रीदेची
दीधली सर्वै l आनंदवनभुवनी
ll ४७ll रामकर्ता, रामभोक्ता l रामराज्य
भूमंडळी सर्वस्व मीच देवाचा
l माझा देव कसा
म्हणे ll४८ll हेंचि
शोधूनि पाहावे l राहावे निश्चळी
सदा सार्थक श्रवणें
होते l आनंदवनभुवनी ll४९ll वेदशास्त्र,
धर्मचर्चा l पुराणे महात्मे किती
कवित्वें नूतनें जीर्णे l आनंदवनभुवनी
ll५०ll गीत संगीत
सामर्थ्ये l काय कल्लोळ
ऊठिला l मिळाले सर्व अर्थार्थी
l आनंदवनभुवनी ll५१ll वेद
तो मंद जाणावा
+ सिध्द आनंदभूवनी आतूळ महिमा
तेथे l आनंदवनभुवनी ll५२ll मनासी
प्रचीत आली l शब्दीं विश्वास
वाटला l कामना पुरती सर्वैं
आनंदवनभुवनी ll५३ll येथुनी
वाचती सर्वैं l ते,
ते सर्वत्र देखती
सामर्थ्य काय बोलावे
l आनंदवनभुवनी ll५४ll उदंड
ठेविली नामें l आपस्तुतीच मांडिली
ऐसे हे बोलणे
नाही l आनंदवनभुवनी ll५५ll बोलणे
वाऊगे होते l चालणे
पाहिजे बरे पुढे
घडेल ते खरे
l आनंदवनभुवनी ll५६ll स्मरले
लिहिले आहे l बोलता चालता
हरी काय होईल
पाहावे l आनंदवनभुवनी ll५७ll महिमा
तो वर्णवेना l विशेष
बहुतां परी 'विद्यापीठ'
ते आहे l आनंदवनभुवनी
ll५८ll
सर्वसद्या
कळा विद्या l न
भूतो न भविष्यति
l वैराग्य जाहाले सर्वैं l आनंदवनभुवनी
ll५९ll ll जय
जय रघुवीर समर्थ
ll
समर्थांनंतर २९ वर्षांनी
औरंगजेब मृत्यू पावला व
त्यामुळे दक्षिणेत त्याच्या पक्षाचा
पाडाव झाला असे
इतिहास सांगतो; पण या
'आनंदवनभुवन' लिखाणात पुढे काय
होणार याचे वर्णन
आधीच आलेले आहे,
तेव्हा अशा सिध्द
लोकांना पुढील परिस्थितीचे आधीच
साक्षात्कार होत असत
असे वाटते. कलंकी
पुढे देव होणार
आहे हे भविष्य
रामदासांनी आधीच वर्तवून
ठेवले आहे.
विश्वास असो की
नसो, हे सर्व
संतमहंत लिंगदेहाव्यतिरिक्तच्या घटनांचा पडताळा घेऊ
शकत होते, असे
अनेक साक्षात्कार संतसाहित्यात
आढळतात; म्हणून त्यांच्या शब्दांना
वजनही प्राप्त झालेले
असते. 'आनंदवनभुवन' हे रामदासांचे
लिखाण नुसते वाचूनही
मनाला एका वेगळ्याच
ठसकेदार आनंदाचा अनुभव येतो.
भाषाशैलीचा ठेका मनाला
विभोर करुन टाकतो.
वेगळीच शक्ती अंतरंगात प्रकट
होते आहे असे
वाटते. हे आशय
व भाषेचे सामर्थ्य
संतसाहित्यात पदोपदी दिसते, म्हणून
आत्मानुभवी असलेले हे साहित्य
शतकानुशतके लोकमानसावर अधिराज्य गाजवित
आलेले आहे.
ज्ञानेश्वरीत कुठेही 'विठ्ठल' या
देवाचा उल्लेख नाही, पण
ज्ञानेश्वरांच्या अभंगात पदोपदी विठ्ठलाचा
उल्लेख येतो. असे का?
दोन ज्ञानेश्वर आहेत
की काय? असाही
एक वाद निर्माण
झाला; पण तसे
नाही. वारकरी पंथाने
विठ्ठल ही देवता
प्रामुख्याने उल्लेखित केली. नामदेवांनी
तर विठ्ठलाला जेऊ
खाऊही घातले असे
उल्लेख आढळतात. या वारकरी
पंथाचा पाया ज्ञानेश्वरांनी
घातला. 'ज्ञानदेवें रचिला पाया
l तुका झालासे कळस' - हे
बहिणाबाईंचे भाष्य प्रसिध्द आहे.
"संतकृपा झाली l इमारत
फळा आली ll१ll
ज्ञानदेवें
रचिला पाया l उभारिले
देवालया ll२ll नामा
तयाचा किंकर l तेणें
रचिलें तें आवार
ll३ll जनार्दन एकनाथ
l खांब दिला भागवत
ll४ll तुका झालासे
कळस l भजन करा
सावकाश" - बहिणाबाई.
जातीभेद, वर्णभेद, स्त्री-पुरुष भेद वारकरी
पंथ मानत नाही.
'भक्ती' सर्वांनाच करणे शक्य
आहे या विचाराने
सर्वच लोक एकमेकांच्या
जवळ आले. चोखामेळा,
गोरा कुंभार, सावता
माळी, नामदेव शिंपी,
कान्होपात्रा गणिका, जनाबाई दासी
हे सर्व थोर
भक्त समाजाच्या निरनिराळ्या
थरातून आले असूनही
भक्तीमार्गावर अग्रेसर ठरले. 'भक्ती'
ही उच्चतम मनाची
संवेदनशीलता आहे. या
सर्व संतांचे साहित्य
अजर-अमर झाले;
कारण ते अनुभवाधिष्ठित
होते. निळोबाराय हे
वारकरी पंथाचे शेवटचे वारकरी.
वारकरी हा विश्वासाचा,
भक्तीचा, निष्ठेचा, उच्चतम पातळीवर
जाण्याचा मार्ग असल्यामुळे विठ्ठलाला
सर्व लोकांनी शिरोधार्य
मानले.
शयनी एकादशी
व कार्तिकी एकादशीला
पंढरपूरची वारी करण्याचा
नेम शतकानुशतके अनेक
घराण्यातून चालू आहे.
ही 'निष्ठा' लौकिकतेतून
अलौकिकाकडे वाटचाल करायला माणसाला
भाग पाडते. हिणकस
जळून जाते व
मनाचे सोने तावून
सुलाखून निघते.
संगीता पाटखेडकर.
२०/७/२०१६.
No comments:
Post a Comment