निवांत
क्षणी तरी गं
स्वतःला
नीट भेटशील कधी?
अश्रु
पुसून नयनांतील
काळजातली
काळजी लपवशील किती?
बाहेर
कित्येकदा काय काय बघितलंस
स्वतःच्या
आत डोकावशील कधी?
मनाची
कवाडं उघडशील कधी?
सुखांचे
स्वागत करशील कधी?
छोट्या
छोट्या गोष्टीतला
मनसोक्त
आनंद घेशील कधी?
क्षणाक्षणातले
हसरे उत्सव
साजरे
करशील कधी?
प्रेमळ
काळजाचं स्त्रीमन तुझं
धडधड
त्याची जाणशील कधी?
स्त्रीजन्मा
तुझ्या जगरहाटीत
स्वतःवर
प्रेम करशील कधी?
अंतर्नाद
अंतरीचा
मनापासून
ऐकशील कधी?
स्व
छंदातला शब्द निःशब्द
व्यक्त
करशील कधी?
गं
स्त्री गं सखी सांग
ना?
निवांत
क्षणी तरी गं
स्वतःला
नीट भेटशील कधी?
मृदुला
मुकुंद पाटखेडकर.
१९
नोव्हेंबर २०१९.
How to gamble at the casino - JSH Hub
ReplyDeleteof the casino at the casino: Casino Resort in 태백 출장마사지 Atlantic City The 영주 출장안마 casino 진주 출장샵 will add more 거제 출장마사지 video 전라북도 출장안마 slots, which will serve as a gateway to