अखंड ज्ञानगंगेत न्हाऊन निघालास 'ज्ञानयोगी' च होतास
'माझे ज्ञान वाळूच्या कणाएवढेच' म्हणणाऱ्या 'न्यूटन' सारखा विनयीसुद्धा
शालेय प्रथमपायरीपासूनच पहिला नंबर कधी सोडला नाहीस
मॅट्रिकलाही विदर्भातून प्रथम आलास, साऱ्या कुटुंबियांना केलेस विजयी.
'शांतीस्वरूप भटनागर' पुरस्कार असो की 'जगदीशचंद्र बोस' अवॉर्ड
'मित्रा पुरस्कार' असो की देशविदेशातील प्रसिद्ध लेखांचे खूपच मोठे बाड
तुझी 'स्थितप्रज्ञता' कधी ढळली नाही की कधी तू कर्तव्याला चुकलास
सदा नम्र आणि गोड वाणी तुझी, अपरंपार मायेचा वारसा तू दिलास.
मुंबई असो की बंगलोर, पिलानी असो की रुरकी, कानपूर असो की हैदराबाद
स्वतः च्या गुणवैशिष्ट्यांनी तू ठरलास नाबाद
सर्वच ठिकाणच्या सहकर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना तू तुझ्या प्रतिभेने केले आश्चर्यचकित
ते ते ठिकाण सोडायची वेळ आली की तुझ्या उदारपणाने सर्वच होत अचंबित.
लेखिका: संगीता पाटखेडकर.

वैशाली व कौस्तुभ तुझी मुले तुझ्या कर्तृत्वाला उत्तुंग पोहोचविणारी
मंदा तुझी प्रिय पत्नी व आम्ही सर्वच तुझे ऋणानुबंधी, तुझी खूप वाट पाहणारी
तुझ्या आठवणीने होतो आम्ही सर्वच व्याकुळ
तुझ्या स्मृतींना वाहते ही भावपुष्पे; होऊन शोकाकूल.
लेखिका: संगीता पाटखेडकर.
आई , तुझ्या भावाविषयी तुझ्या मनांत असलेला आदर या कवितेतून जाणवला. एकूणच प्रमोद मामाने मिळविलेले पुरस्कार आणि यश याचे सुरेख वर्णन तू या कवितेत केलेस!!
ReplyDelete