आकाश
रंगी
चादरीवर
कापूस
पिंजला
जसा...
पाय
जमिनीवर
ठेवूनी
सहज
बघता
आज
आकाशी
शुभ्रातिशुभ्र किमया भासवी तो असा...
नसे
त्यास
कसलीही
करडी
छटा
नसे
त्यास
इवलीशीही
काळी
किनार
जादू
अशी
ही
धवलतेची
मनांत
उठवी
तरंग
तुषार
वाटे
मज
नित्य
बघावे
आकाशी
रंग,
छटा
नि
आकार
त्यांचे
साठवावे
हृदयाशी
रोजच
वरती
नभांत
जमत
असेल
की
हो
अशीच
किमया?
व्यस्त,
त्रस्त,
सुस्त
नि
निमग्न
असे
अपुली
मानवी
दुनिया
प्रश्न
रोज
पडे
मनीं
नवा
असा...
बघण्या
सौंदर्य
निसर्गाचे
नित्य
काढू
वेळ
मी,
कुठे
आणि
कसा??
आकाश
रंगी
चादरीवर
कापूस
पिंजला
जसा...
पाय
जमिनीवर
ठेवूनी
सहज
बघता
आज
आकाशी
शुभ्रातिशुभ्र किमया भासवी तो असा...
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
१२
सप्टेंबर
२०१७.
No comments:
Post a Comment