ॐ
नमोजी
आद्या
।
वेद
प्रतिपाद्या
॥
जय
जयाजी
स्वसंवेद्या
।
आत्मरूपा
॥१॥
देवा
तूंचि
गणेशु
।
सकळमति
प्रकाशु
॥
म्हणे
निवृत्ति दासु । अवधारिजो जी ॥२॥ अकार चरण युगुल । उकार उदर विशाल ॥ मकार महामंडल । मस्तकाकारें ॥३॥ हे तिन्ही एकवटले । तेथें शब्दब्रह्म कवळलें ॥ ते मियां श्रीगुरुकृपें नमिलें । आदिबीज ॥४॥ - संत ज्ञानेश्वर.
'गजानना, श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया.' 'प्रथम तुला वंदितो, कृपाळा..... गजानना, गणराया.' - अशा अनेक ओव्या, गाणी आणि कवितांनी हे भाद्रपद महिन्यातील दहा दिवस मंतरलेले राहणार! कोणताही यज्ञयाग असो, सण, समारंभ असो, उत्सव असो, श्रीगणेशाला प्रथम पूजेचा मान आहे. गणेश.... गणाधिप, गणनायक, गणराज, गणांचा म्हणजेच लोकांचा राजा; गणपती. 'गणपती' हा 'गुणपती' सुद्धा आहे. वडील शंकर आणि माता पार्वतीने त्याचे नाव सुरुवातीला 'गुणेश' ठेवले होते म्हणतात. १४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असलेल्या या गणेशाला संगीत, नृत्य, गायन, वादन, बुद्धीचातुर्य, ज्ञान, तंत्रज्ञान युद्धकौशल्य...... इ. इ. सर्व गुणवैशिष्ट्ये आहेत. त्याच्या या सर्वगुणवैशिष्ट्यांशी निगडित अनेक कथाही प्रसिद्ध आहेत.
'ॐ कार प्रधान रुप गणेशाचे l हे तिन्ही देवांचे जन्मस्थान l अ कार तो ब्रह्मा, ऊ कार तो विष्णू, म कार महेश जाणियेला'l
गणपतीला
सहस्त्र
नामें
आहेत.
प्रत्येक
नावाचीही
वेगळी
कथा
आहे.
'वक्रतुंड',
'विघ्नविनाशक,'
'एकदंत'....
या
त्यापैकी
प्रसिद्ध
कथा.
अष्टविनायकांची महती तर काय वर्णावी? तेथील प्रत्येक स्थानाची आख्यायिका निराळीच!
लोकमान्य
टिळकांनी
एकूणच
भारतीय
समाजात
एकजूट
राहावी,
सगळीकडेच
सामाजिक
व
राजकीय
समता
नांदावी
या
उद्देशाने
आपला
देश
पारतंत्र्यात असतांना महाराष्ट्रात प्रथमच गणपतींना सार्वजनिक स्वरुप प्राप्त करुन देण्याचा श्रीगणेशा केला. कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात करण्यापूर्वी त्याला वंदन तर केले जातेच; पण आपण सर्वजण एक वाक्य नक्कीच उच्चारतो, 'चला, तर मग श्रीगणेशा करु या'. मला आईने काळ्या पाटीवर प्रथम 'श्रीगणेशा' गिरवायला लावले. लाल कमळ, जास्वंदाचे फूल, २१ दुर्वांची जुडी, २१ मोदक त्याला महत्प्रिय! यासोबतच बेल, तुळशी, अर्जुन(वनस्पतीचे नाव), शमी, आघाडा, केना, अशा २१ वनस्पती त्याला याकाळात अर्पण करावयाच्या असतात. आहे की नाही, तो स्वतःच 'इको फ्रेन्डली??.' त्यानेच दिलेले आपण त्याला अर्पण करीत असतो. त्यात आपला अभिमान तो कसला?
'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया' असा नामघोष आपण करतो; या ओळींनाही गणेशाचे परमभक्त असलेल्या 'मोरया गोसावी' यांच्या भावभक्तीचा स्पर्श आहे. इथे हा देव भक्ताच्या नावाने ओळखला जातो. हा नामघोष केल्याशिवाय या उत्सवाला परिपूर्णता येत नाही. या उत्सवातील दहा दिवसांनाही आगळेवेगळे महत्व आहे. ऋषिपंचमी, गौरींचे आगमन हे त्यापैकी महत्वाचे! 'ऋषिपंचमी'- शेगावनिवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव मोठ्या थाटात साजरा होतो. 'ऐसा सोहळा न देखियेला डोळा' असे वातावरण असते. यादिवशीच्या शेगाव नगरीला दिव्य स्वरुप प्राप्त होते. वातावरणात सगळीकडे मंगल लहरी पसरतात. 'गण गण गणांत बोते' या महाराजांच्या मंत्राचा अखंड नामघोष सुरु असतो. 'गण' म्हणजे लोकांचा समूह! समाजातल्या सर्व लोकांमध्ये ईश्वरी तत्व आहे, असा संदेश देणारा हा मंत्र. महाराजांचे नावही 'गजानन!' त्यांना गणेशाचाच अवतार मानले जाते. एकूणच 'बाप्पा' येण्याच्या आधीपासूनच सगळ्यांनी मनाने त्याच्या स्वागतासाठी लागणाऱ्या पूर्वतयारीचा उत्साहाने श्रीगणेशा आधीच केला असतो. तो सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहे. अखिल महाराष्ट्राचे लाडके दैवत. बाप्पाची अनेक हिंदी आणि मराठी गाणी प्रसिद्ध आहेत. 'अष्टविनायक' या मराठी सिनेमातील गाणी तर खूपच सुंदर आहेत. 'अष्टविनायका, तुझा महिमा कसा', या गाण्यांतून आठ ठिकाणच्या विनायकांची कथा अतिशय सुरेल आणि सुंदर शब्दात वर्णिली आहेत. लहान, थोर, स्त्री, पुरुष, गरीब, श्रीमंत, वेगवेगळ्या जाती धर्मांचेसुद्धा, या गणाधिपाचे भक्त आहेत. मूर्ती छोटी असो की मोठी, सर्वांचेच चित्त वेधून घेणारी आणि आकर्षक; म्हणूनच त्याला 'मंगलमूर्ती' म्हणतात. या दिवसांत मन आपोआपच विविध गणेशमय गाण्यांवर तरंगायला लागते. आवाज कितीही भसाडा आणि बेसूर असला तरी ही गाणी गुणगुणावीशी वाटतात. सगळीकडे उत्साहाचे, चैतन्याचे, भक्तिमय, संगीतमय आणि positive vibrations पसरविणारे वातावरण तयार होते.
या
उत्सवात
अनेकजण
वेगवेगळ्या
संकल्पांचा
श्रीगणेशा
करतील.
मग
ते
सार्वजनिक
मंडळांद्वारे राबविलेले सामाजिक उपक्रम असोत की वैयक्तिक असोत! टिळकांना शुद्ध अंतःकरणातून आणि देशप्रेमाच्या भावनेतून, सामाजिक जाणिवेच्या जागृतीतून या उत्सवाची सफलता अपेक्षित होती. आपण याबाबतीत खरंच स्वातंत्र्योत्तर काळात यशस्वी आहोत का?? असा सवाल आज मनात आला. मध्यंतरीच्या काळात या उत्सवाला बीभत्स रुप आले होते. अनेक मंडळे त्यासाठी कारणीभूत होती. आज सरकारला कायदे करावे लागले. ध्वनिप्रदुषणाचा मारा त्यात प्रामुख्याने होता. 'इको फ्रेन्डली' या संकल्पनेचा श्रीगणेशा करावा लागला. टिळकांच्या काळात गणेशोत्सवात 'व्याख्यानमाला' आणि 'संगीत मेळावे' आयोजित केले जात, त्यामुळे समाज प्रबोधन होई. आजही बरीच मंडळे सामाजिक भान ठेवून वेगवेगळे उपक्रम राबवू शकतात. उत्साहाला जसे मोल नसते तसेच सेवेलाही मोल नसते. या सर्वात महत्वाची असते ती सर्वांच्या मनाची शुद्धता. शुद्ध आणि सदाचारी मनाची माणसेच आज दुर्मिळ झाली आहेत. भेदाभेद, एकमेकांमध्ये चढाओढ, यश मिळविणा-याला पुढे जातांना खाली खेचण्यासाठी काय वाट्टेल ते प्रयोग करणे, मनात द्वेष आणि मत्सराची भावना, सूडाची भावना, खून, चोरी, लांडीलबाडी, हे दुर्गुण असलेले काही लोक समाजाला कलुषित करीत आहेत. देशात, किंबहुना सर्वच जगात संस्कारी, शुद्ध आणि पवित्र मन असलेल्या अनेक लोकांची साखळी निर्माण होईल तरच सगळीकडे 'सुराज्य' नांदेल. कौरव आणि पांडव जर एकत्र असते तर ते १०५ होते. पण....दुराचार, अनिष्ट नीती यांमुळे त्यांचाच नाही तर संपूर्ण हस्तिनापूरचा विनाश झाला. 'न भूतो न भविष्यती' असा!! एकोप्याला किती महत्व आहे, याचे हे सबळ उदाहरण!
या
उत्सवाच्या
निमित्ताने
आपण
सर्व
युवावर्गाने
चांगले
संकल्प
करु
या
आणि
शुद्ध
अंतःकरणाने
ते
तडीस
नेण्याचा
प्रयत्न
करु
या.
संकल्पसिद्धीचा दाता आपल्यासोबत आहेच. नवनवीन ज्ञान आणि तंत्रज्ञान शिकू या. आपण ज्या कुठल्याही क्षेत्रात काम करतो, ते मन लावून करु या; अर्थात सर्वांना सोबत घेऊन!! एकजुटीने!! सार्वजनिक गणेश मंडळातही अनेक तरुण कार्यकर्ते असतात. वर्गणीतला काही भाग शेतकऱ्यांच्या हितासाठी, गरिबांसाठी, अशिक्षित लोकांना शिक्षण देण्यासाठी, महिलांच्या सबलीकरणासाठी वापरु या. युद्धात गणपती देवांचा सेनापती होता. त्यानेच त्याकाळी प्रथम महिलांना फौजेत सामील केले, अशा कथा आहेत. 'प्रथमेश' हे त्याचे आणखी एक नाव. आपण बाप्पाजवळ वेगवेगळ्या मागण्या करण्यापेक्षा यानिमित्ताने त्याला आपण काय भेट देऊ शकतो? याचा विचार करु या. वेगवेगळ्या सामाजिक कार्यांचे सारणरुपी अमृतमयी दिव्य मोदक त्याला अर्पण करु या. तर आणि तरच हा उत्सव ख-या अर्थाने सफल होईल.
चला
तर
मग,
लावू
या
निरागस
सूर??
करु
या
श्रीगणेशा........
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
No comments:
Post a Comment