पिताश्री,
निवृत्त
होईपर्यन्त
तू
,
बदलीची
नोकरी
करत
राहिलास....
कष्टाचाच
होता
तुझा
पिंड
केलीस
माया
आम्हांवरी
इतकी
तू
,
पडला
नाही
कधीच
कुठे
त्यात
खंड
झिजत
राहिलास
चंदनापरी
अमुच्यासाठी
तू
अखंड
पिताश्री,
राब-राब राबत राहिलास....
सुखाचा
घास
लेकरांस
आम्हां
भरवत
राहिलास....
सारे
सखे
सोबती
गेले
दुःख,
यातना
सोसल्या
तू
किती....!!!
....तरीही डगमगला नाहीस
उभा
राहिलास
एकटाच.....!!!!
सोबतीला
घेऊन
खंबीरपणा
मोडलास,
कोलमडलास....पण...
वाकला
नाहीस
तू
कधी
ताठ
होता
तुझा
कणा
पिताश्री,
तुझ्या
ह्याच
आदर्शांचा
घातलास
अम्हांपुढती
तू
नवा
पायंडा
कशी
होऊ
उतराई??
उपकारांचे
तुझ्या
कसे
फेडू
पांग??
पिताश्री,
सांग
मजसी
तूच
आता
सांग??
तुझ्या
प्रेमळ
मायेचा
काय
ठरवू
मी
मापदंड??
पिताश्री,
कष्टाचाच
होता
तुझा
पिंड
कष्टाचाच
होता
तुझा
पिंड
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
१३ सप्टेंबर २०१७.
No comments:
Post a Comment