Saturday, 23 September 2017

दिव्य स्तुती



आई जगदंबे अंबे रेणुके

फुलांत तू , पानांत तू

ह्या चराचरांत तू

मम हृदयी सदा वससी

बनूनी आत्मतेज तू

सामर्थ्य शक्तीरुपा तू

उजळो जीवन कांती

 

आई जगदंबे अंबे रेणुके

फुलांत तू , पानांत तू

ह्या चराचरांत तू

 

कुमारिका ब्रह्मरुपिणी

आदिमाया तू सरस्वती

वर देई मजला, स्वर देई

देसी मजला अखंड स्फूर्ती

 

आई जगदंबे अंबे रेणुके

फुलांत तू , पानांत तू

ह्या चराचरांत तू

सृष्टीची दिव्य शोभा तू

दुष्टांसाठी मेघ चपला तू

माजिता दानवगण आसुरी कहर

ठेवसी त्यांच्यावरी तू प्रतापे, करडी नजर

काय वर्णू मी पामर

तव पराक्रम ख्याती

 

आई जगदंबे अंबे रेणुके

फुलांत तू , पानांत तू

ह्या चराचरांत तू

 

नवरंगी भरजरी शालू

गळ्यांत मोतीमाळा घालू

नवदिनीं नवरात्रीत ह्या

आनंदाने गरबा खेळू

साठवू नयनांत अपुल्या

ती दैवी सुंदर व्याप्ती

 

आई जगदंबे अंबे रेणुके

फुलांत तू , पानांत तू

ह्या चराचरांत तू

हाती शोभे हिरवा चुडा

सजवू रांगोळ्या नि सडा

नरजन्म हा मिळे एकदाच

शपथ ह्या नवरात्री घेऊ

उचलू सत्कार्याचा विडा

सत्य सुविचारांची....

स्वच्छ मनामनांची....

भावना परोपकाराची

नांदो सदा ह्या जगती

 

आई जगदंबे अंबे रेणुके

फुलांत तू , पानांत तू

ह्या चराचरांत तू

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२३//२०१७.

No comments:

Post a Comment