अनेकांच्या
अंगणी
परसात,
बगिचात
उभा
राही
डौलात
तो
एक
तगर
कुणी
म्हणे
त्यांस
स्वस्तिक
फूल
कुणा
भासे
तो
कानातील
डूल
पडता
सडा
त्याचा
अंगणी
भरगच्च
देठ
राही
वर,
खाली
निजे
फूल
फुलाफुलांच्या ह्या धवल माळा
मनांस
पाडती
आगळी
भूल
गर्द
हिरव्या
पर्णकुशीत
फुलांची
ह्या
असे
वस्ती
एका
फुलाजवळी
अनेक
फुलें
किती
सारी
बिलगती
हारांत
ती
शोभून
दिसती
सुगंधाविना
फुले
ही
दिसती
किती
सुंदर
अनेकांच्या
अंगणी
परसात,
बगिचात
उभा
राही
डौलात
तो
एक
तगर
झाड
जराही
हलविता
शुभ्र
फुले
ही
धरतीस
भेटती
एकटा
प्रवास
नसे
त्यांचा
साथ-संगतीने सारे नांदती
परडीत
जमता
सारी
फुले
जणू
दोस्ती
त्यांची
फुलविती
वर्षावात
वर्षा
ऋतूच्या...
सृष्टी
बहरात
घालती
भर
अनेकांच्या
अंगणी
परसात,
बगिचात
उभा
राही
डौलात
तो
एक
तगर
....तो एक तगर.....तो एक तगर...
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
१९/९/२०१७.
No comments:
Post a Comment