आज
दिवाळी
पाडवा
अलगद
येई
मनांत
बाबा,
तुमच्या
आठवणींचा
गोडवा
ओवाळीत
असे
तुम्हाला
मी
या
दिवशी
शुभ
कुंकुम
टिळा
भाळी
शोभतसे
अक्षदांच्या
राशी
आनंद
पाडवा
साजरा
होई
दिवाळीच्या
दिवशी
सहवासात
तुमच्या
सदैव
चाखला
मेवा
आज
दिवाळी
पाडवा
अलगद
येई
मनांत
बाबा,
तुमच्या
आठवणींचा
गोडवा
'आधी खावे चणे लोखंडाचे
मग
तो
ब्रह्मपदी
नाचे'
हा
कष्टाचा
मंत्र
तुमच्याकडूनच शिकावा
तुमच्या
राज्यात
पाहिले
नाही
मी
कधी;
अनुभवले
नाही
मी
कधी
कडक
ऊन
तुमच्या
मायेच्या
सावलीचे
छत्र
आहे
माझ्या
डोक्यावर
अजून
आज
नसलात
तुम्ही
या
दुनियेत
तरी
तुमच्या
आठवणींनी
आज
क्षण
अन्
क्षण
सोनेरी
व्हावा
आज
दिवाळी
पाडवा
अलगद
येई
मनांत
बाबा,
तुमच्या
आठवणींचा
गोडवा
नुसती
परीक्षेत
पास
झाली
तरी
पेढे
सर्वांना
वाटायचे
तुम्ही
लेक
माझी
लाडकी
म्हणून;
कित्ती
लाड
करायचे
तुम्ही
कित्ती
हट्ट
पुरवायचे
तुम्ही
सहज
चालता
बोलता
गप्पागोष्टीत
जीवन
मूल्ये
सांगायचे
तुम्ही
छोट्या
गोष्टीत
कसा
मिळवावा
आनंद
तो
तर
तुमच्याकडूनच घ्यावा
संस्कारांच्या शिदोरीचा दिला तुम्ही, मला
आयुष्यभर
पुरुन
उरेल
इतका
ठेवा
आज
दिवाळी
पाडवा
अलगद
येई
मनांत
बाबा,
तुमच्या
आठवणींचा
गोडवा
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
२०
ऑक्टोबर
२०१७.
No comments:
Post a Comment