Thursday, 5 October 2017

कोजागिरी


चांदण्यांची खैरात लेऊनी

नक्षत्रांचा साज लेऊनी

रात्रीस खेळ मांडते ही रात चंदेरी

आज आली कोजागिरी

आज आली कोजागिरी

 

कोण कोण जागरण करी

कोण जागे आहे सखी री

पाहण्या लक्ष्मी येई घरोघरी

आज आली कोजागिरी

आज आली कोजागिरी

 

गुलाबी थंडीची झुळूक न्यारी

केळीच्या पानांची सजावट अंगणी

बसविले भुलगा-भुलाबाई समजून

लक्ष्मीन्द्र, शिव आणि गौरी

आज आली कोजागिरी

आज आली कोजागिरी

 

घरोघरीच्या मुलींचा उत्साह भारी

गाणी गाती भुलगा-भुलाईची

घेऊनी हाती टिपरी

नाद तो दुमदुमे अंबरी

खिरापत करण्या माऊली लगबग करी

आज आली कोजागिरी

आज आली कोजागिरी

 

चांदण......चांदण प्रकाशी....

दूध आटवण्या सज्ज नारी

बासुंदीच्या स्वादाला उपमा नसे दुसरी

पूर्णचन्द्र हासरा आणि रोहिणी हासरी

आज आली कोजागिरी

आज आली कोजागिरी

 

आज रात दिसे नवी, नवेली साजिरी

सुंदर दिसती सा-या मैत्रीणी

एकत्र जागती रात सारी

आटो अपुल्या दोस्तीची खुमारी

आटो अपुली प्रेमाची यारी

जणू साद घालती आज सा-या नभांतरी

आज आली कोजागिरी

आज आली कोजागिरी

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment