Thursday, 19 October 2017

प्रकाशपर्व



मिट्ट असा काळोख दाट

प्रकाशालाही काढावी लागते वाट

काळोखाला आमंत्रणं नसतात

तो येतोच आपोआप बोलावता

प्रकाशासाठी मात्र करावी लागते खटपट

 

दरी दरीतूनी, खो-या खो-यातूनी

वाटे काळोखास जिंकलो आपण

अज्ञानास वाटे जिंकलो आपण

दुःखास वाटे जिंकलो आपण

दुष्टांना वाटे जिंकलो आपण

जिंकला काळोख म्हणता म्हणता

पणती प्रकाश पसरे पाहता पाहता

जिंकला मन काळोख म्हणता म्हणता

प्रकाश पडो मनांत, उजळो मन ज्योती

अज्ञान, दुःख, दुष्टांच्या जळो वाती

तेजाचा लख्ख प्रकाश पडो तिमिराभोवती

ज्ञानधन, विचारधन, आयुष्यधन आणि

लक्ष्मी धनाचा वर्षाव होवो सर्वांवरती

उजळो गावे, उजळो शहरे, उजळो देश उजळो प्राणी, उजळो पक्षी, उजळो सृष्टी

दिपांनी उजळो सारे विश्व

भारुनी टाको वाट नि वाट

दिपवूनी जावो दिशा नि दिशा

मनामनांस सापडो प्रकाशवाट

प्रकाशवाट.....प्रकाशवाट...

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment