Friday, 6 October 2017

चन्द्र आहे साक्षीला


चन्द्र आहे साक्षीला

बासुंदीच्या स्वादाला

टिप-यांच्या नादाला

रोषणाईच्या संगतीला

बेधुंद निळाईला

लक्ष्मीच्या आगमनाला

उधाण आले उत्साहाला

नजरेत भरलेल्या शरदाला

सोळा कलांच्या कलागतीला

बहर आला पौर्णिमेला

शितल, सुंदर चांदोबाला

लक्ष कोटी चन्द्र किरणांच्या अमृताला

धवल लख्ख प्रकाशाला

नवा साज रात्रीला

निसर्ग निरामयतेला

लक्ष्मीन्द्राच्या प्रसन्नतेला

सर्वांच्या आपुलकीला

 

चन्द्र आहे साक्षीला

कोण कोण जागं आहे...

ऐकलंत का????....

चन्द्र आहे साक्षीला

चन्द्र आहे साक्षीला.

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment