Saturday, 21 October 2017

दिवाळी भाऊबीज


   आज बहिणीची माया भाऊरायासाठी

   आज भावाला वाटे ओढ बहिणीसाठी

 

     अक्षवानाचा थाट असते दिवाळी

    ओवाळण्याची हौस असते दिवाळी

  बहीण भावाच्या प्रेमाची साक्ष दिवाळी

   भाऊ जाती बहिणीला भेटण्यासाठी

 

   आज बहिणीची माया भाऊरायासाठी

   आज भावाला वाटे ओढ बहिणीसाठी

 

        नको कोणती वस्तू

        नको कोणती साडी

       नको कोणता दागिना

        नको कोणती भेट

   भाऊराया, तू यावा, तू दिसावा आनंदी

        तुझी व्हावी भेट

     हीच खरी 'भेट' माझ्यासाठी

 

    आज बहिणीची माया भाऊरायासाठी

    आज भावाला वाटे ओढ बहिणीसाठी

 

      ऋणानुबंधाच्या अपुल्या गाठी

     ओवाळण्या मन आतुर तुजसाठी

        आकाशाकडे नयन आतुर

        चन्द्राच्याही भेटीसाठी

       

    आज बहिणीची माया भाऊरायासाठी

   आज भावाला वाटे ओढ बहिणीसाठी

    

         कीर्ती तुझी व्हावी

       हवी ती इच्छा तुझी पूर्ण व्हावी

      सुख, समृध्दी, आरोग्य, ज्ञानाने

  भाऊराया, तुझी जीवन पणती प्रकाशावी

    जीवनज्योत बहरावी, मोहरावी

      जीवनात तुझ्या या सदैव

     आनंद, ऐश्वर्य कारंजी बरसावी

     हीच मोठ्या बहिणीची शुभेच्छा

      अंतःकरणातून भाऊरायासाठी

 

   आज बहिणीची माया भाऊरायासाठी

   आज भावाला वाटे ओढ बहिणीसाठी

 

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

No comments:

Post a Comment