काल
संध्याकाळी
फेसबुक
वर
एक
चित्रं
पाहिलं...संध्यासमयीचं होतं ते!! सूर्याचा पिवळाधम्म गोल मावळतीकडे झुकून पाण्यात प्रतिबिंबित झालेला!! पाण्याचा अर्धा भाग निळाशार आणि अर्धा भाग पिवळसर!! निळ्या पिवळ्याची नवलाई नयनांत रंग भरु लागली...इतके सुंदर ते दृश्य!! मावळतीच्या डोहात बुडू पाहणारा तो सूर्य जणू काय सृष्टीस सांगतोय, 'मालवून टाक दीप'...असेच वाटले जणू बघतांना!! किनाऱ्यावर कडेला एक शुष्क झाड उभे!! झाडाची प्रत्येक कोरडी फांदी, डहाळी काहीतरी आकार दाखविणारी!! सापाचा आकार दिसला तिच्यात!! कळीचा आकार, माणसाने डोक्यावर हात ठेवलाय, असा आकार, खाली दोन बुंध्यांना जोडून मध्यभागी त्रिकोण तयार झालेला, चोच असलेला बगळा, कुठेतरी बघतोय तो!!, आणि झाडाच्या अगदी बाजूला, त्याच झाडांस न्याहाळत उभी असलेली एक वर आलेली छोटी फांदी,,..माणूस पावलं वर करत टाचांवर उभा राहून जसं बघतो ना कुठे? अगदी तसंच बघणारी!! झाडाच्या वर दोन आकाशातले ढग एकमेकांजवळ येऊ पाहणारे...प्रियकर, प्रेयसीसारखे भेटीसाठी प्रेमातुर!! रंगून गेलं मन!! संध्यासमयीच्या त्या मावळत्या रंगात!!
मला
मावळतीचं
दृश्य
बघायला
आवडतं.
चिखलद-याला खूपदा बघितलं. विदर्भाची शान आहे तो सूर्य......
चिखलद-याच्या मावळतीचा!! विराट अस्तित्व तेजाळून मावळणारा तो सूर्य कसा खुबीने झुकू लागतो हळूहळू...हे बघणारा भाग्यवानच!! शब्दातीत मावळ!!
रोजच
नेमेचि
येते
संध्याकाळ!!
उत्सुकता
असते
काय
घडत
असेल
आज
पश्चिमेस??
रोजचं
रोज
संध्याकाळचं
दृश्य
नवीन
असतं..हे कळत असतं..पण!! बघायला कुठे आलाय वेळ!! माझी संध्याकाळ संगणकात जाते!! खंत म्हणून लिहत नाही हे!! शेवटी..'work is worship,' पण जेंव्हा सुटी असते तेंव्हा मावळती बघितल्याशिवाय चैन पडत नाही. घरच्या गच्चीवरुन बघायला मिळतंच!! पण रोजचं कुतूहल मनांतच ठेवावं लागतं!! असं काय नि किती मनांतच ठेवावं लागतं नाही आपल्याला??
मनातलं....मग अस्सं लेखणीतून मोकळं करावंसं वाटतं...Thanks to लेखणी!!
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
११
डिसेंबर
२०१७.
No comments:
Post a Comment