Sunday, 17 December 2017

गद्यकाव्य चरेवैती - चरेवैती


चालत राहा, चालत राहा

हे चालत राहणेच घडवते जीवनाचे दर्शन

चालत राहण्याने शरीर तर होतेच सक्षम

पण येणाऱ्या अनुभवांनी मनही होते दुर्दम्य

अगम्य वाटचालीमुळे रक्ताचे होते अभिसरण

रक्ताचा लालपणा मनाला भिडतो

आणि कळते शुध्दतेचे महत्त्व

रक्ताचा रंग कधी बदलणार आहे का?

हे रक्तच घडविते तुम्हाला निःसंग

आणि सर्वव्यापी, सर्वात्मक

मनाचे आकाश खोलले जाते

विश्वाचे दरवाजे खुले होतात

जीवनाचे ध्येय गवसते

हातून असीम कार्ये घडतात

'मी' तत्त्व कुठच्या कुठे जाऊन पोहोचते

प्रयोजन गवसते, नियोजन घडते आणि...

संयोजनाने गाभ्याला हात घातला जातो

'एकला चलो रे' म्हणणारे रविन्द्रनाथ टागोर

विश्वाला गवसणी घालते झाले

गुहेत जाऊन बसणारे रामदास,

देहूच्या डोंगरावर जाऊन चिंतन करणारे तुकाराम

'चरेवैती, चरेवैती' मंत्रच जपत होते जणू!!

चालत राहणारी व्यक्तित्वेच पोहोचतात..

अंतिम साध्याप्रत!!

विवेकानंद आठवतात ना!

सगळेच महापुरुष चरेवैती करणारे,

प्रवास कधी संपलाच नाही, अखंड प्रेरणादायी ठरले.

तेंव्हा....चरेवैती - चरेवैती -

चालत राहा, चालत राहा.....

 

संगीता मुकुंद पाटखेडकर.

१७/१२/२०१७.

No comments:

Post a Comment