Wednesday, 20 December 2017

आठवणींचं बोट.


दिवस येतील

दिवस जातील

तारीख आजची

आजप्रमाणेच.....

दरवर्षी येईल

दरवर्षी जाईल

 

.....तरीही बाबा!!....

तुमच्या आठवणींचं एक बोट

माथी माझ्या टपली मारुन जाईल!!

 

अवतीभोवती असेल माझ्या

असंख्य माणसांचा मेळा

पण त्यात नसतील बाबा!!

तुमच्या श्वास कळा

दडवुनि आसू

चेह-यावर तर मला

ठेवावंच लागेल हसू

जावं लागेल उत्सवांत

मग्न राहावं लागेल कार्यात

निभवाव्या लागतील सर्वच वेळा

दिनमासांत सा-याच.....

काय काय घडुनि जाईल??

 

दिवस येतील

दिवस जातील

तारीख आजची

आजप्रमाणेच.....

दरवर्षी येईल

दरवर्षी जाईल

 

.....तरीही बाबा!!....

तुमच्या आठवणींचं एक बोट

माथी माझ्या टपली मारुन जाईल!!

 

जगी ह्या जीवनाच्या

कितीतरी सहन केल्या तुम्ही

दुःखातिरेक झळा...

साध्या राहणीतून फुलविला

तुम्ही संसार मळा

आभाळमायेनं भरुन ठेवलं

लेकरांसाठी तुम्ही मन आभाळ

ते क्षण नि क्षण तुमच्या सोबतीचे

कसे मी विसरुन जाईल??

 

दिवस येतील

दिवस जातील

तारीख आजची

आजप्रमाणेच.....

दरवर्षी येईल

दरवर्षी जाईल

 

.....तरीही बाबा!!....

तुमच्या आठवणींचं एक बोट

माथी माझ्या टपली मारुन जाईल!!

 

संग अनंताचा गाठण्या...

निःसंग होऊनि गेलात तुम्ही

संग आयुष्यासवे जपला

रसिक मन ठेवुनि तुम्ही

वाटलंही नव्हतं बाबा कधी!!

अखेरचा श्वास तुमचा

आमच्या श्वासास असा

चटका लावून जाईल??

 

दिवस येतील

दिवस जातील

तारीख आजची

आजप्रमाणेच.....

दरवर्षी येईल

दरवर्षी जाईल

 

.....तरीही बाबा!!....

तुमच्या आठवणींचं एक बोट

माथी माझ्या टपली मारुन जाईल!!

 

मृदुला मुकुंद पाटखेडकर.

२०/१२/२०१७.

No comments:

Post a Comment