चैतन्याचा
तुकडा
मागे
ठेवून
जातोय
सूर्य
अस्ताला
जातोय
सकाळची
सौम्यता
दुपारची
प्रखरता
संधेची
शांतता
तांबूस
रंगात
निरभ्र
निळाई
लपवतोय
सूर्य
अस्ताला
जातोय
सजीवांची
हालचाल
प्रकाशकिरणांनी भरलेलं
सृष्टीचं
आभाळ
कवेत
घेतोय
चैतन्याचा
तुकडा
मागे
ठेवून
जातोय
सूर्य
अस्ताला
जातोय
मावळतीचा
रंग
चढतोय
दिवसाचा
साज,
शृंगार
रजनीत
विसावू
पाहतोय
सूर्य
अस्ताला
जातोय
मावळतीची
विरळ
शांती
तेजाचा
लख्ख
प्रकाश
निस्तेज
होतो
सावकाश
आजचा
अस्त....
उद्याचं
नवतेज
सतेज
करतोय
चैतन्याचा
तुकडा
मागे
ठेवून
जातोय
सूर्य
अस्ताला
जातोय
चैतन्याचा
तुकडा
मागे
ठेवून
जातोय
सूर्य
अस्ताला
जातोय
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
१६/१२/२०१७.
No comments:
Post a Comment