"मांजर पाळणे ही एक रोमँटिक हौस आहे. तशी ती न पाळताही तुमच्या आसपासच्या परिसरावर कब्जा करून असते. आसपासच्या पक्ष्यांना, लहानश्या प्राण्यांना सुखाने न जगू देणे हा तिचा धर्म आहे. तुम्ही न पाळलेली मांजर देखील तुमच्या घर- अंगणात येऊन "बघतोस काय रागाने" अशा आविर्भावात वावरत असते. कर बाई काय करायचे ते, असे म्हणून नाद सोडून द्यावा लागतो तिचा. तिच्या मागे पुढे बोके पण फिरू लागतात आपल्या हद्दीत. ते ही तसलेच. मागे एक रिपोर्ट वाचला होता, न्यूझीलंडचा असेल. पाळीव मांजरी मालकाचे तर खा खा खातातच पण त्या परिसरातल्या 36 एक सजीवांना दमदाटी करत त्यांच्यावर ताव मारतात, असे त्यात लिहिले होते. एक मांजर तुमच्या बागेत फिरणे म्हणजे इतके सजीव दूर पळणे, नष्ट होणे."
शेवटी
एक
दिवस
तो
दिसला.
शाळेत
जातांना
रस्त्यात!!
तिथूनही
तो
माझ्याकडे
वटारुन
बघत
असे.
दुसऱ्या
दिवशीपासून
पुन्हा
तो
खिडकीत
येऊ
लागला.
बाबा
त्याला
बशीभर
दूध
प्यायला
देत
असत.
काही
सेकंदातच
मट्ट
चाटत
असे
तो!!
बशीला
दुधाचे
नामोनिशाण
न
ठेवता!!
तसंही
मार्जार
जातीला
पुरावे
मागे
ठेवायची
सवय
नसते,
हे
मला
तेंव्हा
कळलं.
पाळीव
मांजरींची
नावंही
काही
लोक
छान
ठेवतात.
'Cuttie', 'Cattie', 'Mauu Lee'....वगैरे वगैरे. त्यापैकी 'Mauu Lee' हे नाव मला आवडतं. 'मनीमाऊ' हे सुध्दा प्रेमळ वाटतं उच्चारायला!!
एकूणच
काय
तर
तो
'वटारा',
त्याचे
ते
मोठ्ठे
डोळे
वटारुन
बघणं,....माझ्या डोळ्यांत आजही वटारतंय!!!...साठवल्यासारखं!!!.....
मृदुला
मुकुंद
पाटखेडकर.
८ डिसेंबर २०१७.
काल
खूप
दिवसांनी
एक
मैत्रिण
भेटली
आणि
मांजरीविषयी
वरील
वाक्ये
बोलू
लागली.
माझ्या
office मधील
सहकारी
मुलीला
मांजरींची
फार
आवड.
घरभर
तिच्याकडे
मांजरी
आणि
बोका
फिरत
असतो
म्हणे!!
वेळात
वेळ
काढून
ती
त्यांचे
Live video काढते
आणि
त्यांच्या
लीला
बघत
बसते.
मैत्रिणीसोबत मांजरीच्या गप्पा रंगल्या आणि मलाही खूप वर्षांपूर्वीचा 'वटारा' आठवला. बोका होता तो!! चांगला धष्टपुष्ट!! दाट घारे घारे डोळे!! आमच्या स्वयंपाकखोलीच्या खिडकीत येऊन बसायचा!! कंटाळा असला की जांभया द्यायचा!! मांजर आणि बोक्याची जांभई बघण्यालायक असते. जांभई देतांना हे दोघेही बिच्चारे इतके दिनवाणे दिसतात की त्यांची कीव येते. मुख्य म्हणजे आपल्यासमोर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जांभई दिली तर आपणही जांभई देतो. तसं ह्यांची जांभई पाहिल्यावर माणसाला जांभई येत नाही. हे माझं निरीक्षण!! इतर कुणाचा अनुभव वेगळाही असू शकेल. तो 'वटारा' खिडकीतून आईच्या पोळ्या बघत रहायचा...कदाचित् पोळ्या करणं शिकला असेल असं मला वाटे त्यावेळी!! मी अचानक खिडकीजवळ आली की डोळे वटारुन एकटक तो माझ्याकडे बघत असे. मी केव्हा एकदाची तिथून जाते असं त्याला वाटत असावं. त्याचं 'वटारा' हे नाव मीच ठेवलं. त्याच्यासमोर मी मोठ्यानं त्याच्या नावाचा उच्चार करत असे तो असाः- 'ओ वट्टारा'sssss......पण तो ढिम्म जागेवरुन हलत नसे. 'तू जा इथून, मी नाही जाणार'!!- असे भाव त्याच्या चेहऱ्यावर असत. मला 'वटारा' आवडायचा. काही दिवस तो खिडकीत आलाच नाही. मी त्याला गच्चीत उभी राहून शोधत असे. शेवटी एक दिवस शेजारणीला विचारले, 'वटारा' दिसला का हो तुम्हाला??
'सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को', 'उंदराला मांजराची साक्ष', 'बोक्या खातो खीर पहा'- ह्या एका काव्यातील ओळी, माझ्या आजीने नव्याने शोधलेला 'बोक्कामुच्चू' हा शब्द,- ह्या म्हणी आणि शब्द वाचले की आजही मला तो 'वटारा' आठवतो. शाळेतही ह्या म्हणी पुस्तकात वाचल्या की मला त्याची आठवण येई. उंदीर पकडला की त्याला अमृत मिळाल्यासारखा आनंद होई. त्यावेळी अचानक तिथे कुणी आलं तर तो बोक्कामुच्चू होई, म्हणजे तोंडातल्या तोंडात त्याच्या कारवाया सुरु असत. जणू काही बघणा-याला कळतच नाही असं त्यांस वाटे. 'मांजर डोळे मिटून दूध पितं, पण जगाला ते दिसत नाही'...अशा थाटात ते वावरतं.
No comments:
Post a Comment