अनेकानेक
लहान
मोठ्या
रेघा
म्हणजे
अनेक
आणि
अनेक,
खूप
आणि
खूपच
माणसांची
गर्दी.
यातील
मोठी
रेघ
नेहमीच
लक्ष
वेधून
घेते.
ह्या
मोठ्या
रेघाही
असतात
कितीतरी
वेगवेगळ्या
क्षेत्रात
नाव
कमावलेल्या!!
यातीलच
एक
मोठी
रेघ
म्हणजे
प्रख्यात
अभिनय
कलाकार
दिलीपकुमार,
त्याचे
काय?
रेघ
मोठी
आहेच
की,
त्याच्यापेक्षा मोठी रेघ कोणी ओढली तरच लक्ष जाणार ना - त्या मोठ्या रेघेकडे, पण हे सर्व कशासाठी?
त्याची
स्मृती
गेली
म्हणे!
९५
वर्षे
आयुष्य,
अनेक
मानसन्मान,
पण
आता
सर्व
विस्मृतीत
गेले!
खूप
शॉकिंग
घटना!
आपण
काय
कार्य
साधले,
नाव,
गाव,
पत्ता
काहीच
आठवत
नाही?
कसे
वाटत
असेल?
स्वतःलाच
जिथे
ओळखत
नाही
तिथे
इतरांना
काय
ओळखणार?
या
स्मृतीचे
आयुष्यात
किती
महत्त्व
आहे?
आयुष्य
विणत
जाते
ते
या
स्मृतीच्या
धाग्या
दो-यांनी! संवाद पाठ करणे व ते अभिनयाद्वारे सहजपणे व्यक्त करणे हे ज्याचे जीवनध्येय, ते सर्व विस्मृतीत गडप - आता काय, पुढे काय, मागील सर्व पुसले गेले! पण यात काय नवीन वाटते आहे? आधी आपण कोण होतो हे आपल्याला आठवते का? नंतर कोण राहणार आहोत हे माहीत आहे काय? जन्ममरणाची साखळी आजतागायत चालूच आहे. पण मला भयंकर वाटतो हा प्रकार!
या
स्मृतीच्या
भरवशावरच
आपण
कितीतरी
परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेलो असतो. पेपर लिहितांना काहीच आठवले नाही तर!
थोडक्यात
काय?
स्मृती
ही
फार
मोठी
देणगी
आहे.
वेद
म्हणे
अपौरुषेय
व
मुखोद्गत
करुन
या
पिढीपासून
त्या
पिढीपर्यन्त
पोचविण्यात
आले.
एखाद्या
अपघातामुळे,
शरीराच्या
वृध्दत्वामुळे स्मृती गेल्याची उदाहरणे आहेत. सध्या 'गोठ' ही मालिका पाहताना त्यातील विलासची स्मृती गेलेली आहे. आपले लग्न झालेले आहे हेच त्याला आठवत नाही. 'स्मृती' परत आणण्याचे उपाय जवळजवळ नाहीत. 'वाट पाहणे' हा एकमेव उपाय आहे म्हणतात. मला खूपच लागली ही घटना! म्हणून हा सर्व उपद्व्याप!
'स्मृती' बाई तू कधीच नको होऊस नाराज
कधीच,
कुणावर
हेच
नेहमीसाठीचे
मागणे,
तुला
आज
या
जगाचा
सर्व
पसारा,
तूच
तर
निर्मिलास
आदि-अंत शोधण्याची तूच तर लावलीस आस
सगळ्यांच्या
मोठमोठया
उड्या
तुझ्यामुळेच
तर
आहेत
सगळ्या
कला,
सगळे
वैभव
तुझ्यामुळेच
शिखरावर
पोचविणारी
उत्तुंग
किर्ती
तूच
तर
आहेस
संगीता
मुकुंद
पाटखेडकर.
१६/१२/२०१७.
No comments:
Post a Comment