'हिंद स्वराज ऑर इंडियन होम रुल'- महात्मा गांधींच्या ह्या पुस्तकाची २००९ मध्ये शताब्दी साजरी झाली. ९८ पानी पुस्तक, देशभर चर्चा व लेख. गुजराती व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत गांधींनी हे पुस्तक लिहिले. रीडर व एडिटर असा परस्पर संवाद ह्यात आहे. रीडर - वीर सावरकर वाटतात तर एडिटर स्वतः महात्मा गांधी.
१९०८
साली
'हिंद
स्वराज'
लिहिताना
गांधींना
भारतातल्या
२०१७
साली
निर्माण
झालेल्या
नव्या,
आकांक्षावादी वर्गाची कल्पना आली नव्हती. गांधींची टोकाची नैतिकता प्रत्यक्ष जगता येणं शक्य नाही तरी त्या टोकावरुन भोवताल काय चालू आहे, हे निश्चितच बघता येतं. हीच 'हिंद स्वराज' ची तात्त्विक उपलब्धी!
अनेक
विषय
- स्वातंत्र्य
आंदोलनाच्या
वेळी
ज्या
चर्चा
हिरिरीने
झाल्या
- उदा.
स्वराज्याची
संकल्पना,
भारताच्या
परवशतेची
कारणे,
हिंदु
मुसलमानांचे
परस्परसंबंध,
सत्याग्रह,
शिक्षण
आणि
यंत्र
संस्कृतीवर
गांधींचे
मुक्त
चिंतन
आहे.
मानवी
संस्कृती
हा
विषय
कालबाह्य
कधीच
होत
नाही.
गांधी
भारतीय
संस्कृतीचा
जोरदार
पुरस्कार
करतात.
युरोपमधील
आधुनिक
संस्कृती
शरीरकेंद्रीत आहे. भारताची आध्यात्मिक संस्कृती कधीच लोप पावली नाही असे गांधी म्हणतात. पाश्चात्य संस्कृतीला ते सैतानाची संस्कृती म्हणतात; व या संस्कृतीच्या आधीन जाण्याच्या रोगापासून स्वतःचा बचाव करावा असे ते रीडरला सांगतात.
भारतीयांना
इंग्लिश
सत्तेने
चिरडले
नाही
तर
आधुनिक
संस्कृतीने
भारताला
चिरडले
असे
ते
सांगतात.
धर्म
क्रौर्य
शिकवत
नाही.
आधुनिक
संस्कृतीच्या विकृतीपेक्षा हिंसा परवडली हा त्यांचा विचार. रेल्वे, वकील आणि डॉक्टरांनी भारताचं वाटोळं केलं आहे हा त्यांचा युक्तिवाद आहे. रेल्वेमुळे प्लेग सुरु झाला. माणसं पूर्वी कष्टपूर्वक तीर्थक्षेत्रांना भेटी देत. माणसं आधी भारतभर भ्रमण करीत होती. एकमेकांची भाषा समजून घेत होती.
वकिलांमुळे
भारतात
हिंदु
मुसलमान
वैर
वाढलं
असा
त्यांचा
थेसिस
आहे.
वैद्यकीय
व्यवसायाच्या माध्यमातून इंग्रजांनी भारताला गुलाम केलं. डॉक्टर रोग्याला औषधांचा गुलाम करतो. दुर्गुणांमुळे रोग होतात, सद् गुण आणि योग्य वागणूक आत्मनियंत्रणाला पोषक असते व डॉक्टरची गरज लागत नाही असे त्यांचे विचार.
गुजराती
भाषेत
संस्कृतीचा
अर्थ
चांगली
वागणूक
हा
होतो.
समाधान
हे
मानसिक
असतं!
श्रीमंत
माणूस
म्हणजे
सुखी
हे
समीकरण
गैर
आहे.
यंत्रांऐवजी
जी
कामे
हाताने
करता
येतात
ती
करावी.
शरीर
सुदृढ
राहतं.
"The Indian civilization as described by me, has been so described by its
voteries" - हे गांधींचे नेमके शब्द आहेत.
आम्ही
जोपर्यंत
जिवंत
आहोत
तोपर्यंत
दया
- भावनेला
सोडचिठ्ठी
देऊ
नये.
आत्मशक्तीची
त्यांनी
तरफदारी
केली
आहे.
'You can't expect silver ore in a tin mine.' मानवी इतिहास लढायांचा आणि हिंसेचा आहे. तिथे आत्मशक्तीचे पुरावे मिळूच शकत नाहीत.
मृत्यू
हाच
ज्याचा
मित्र
आहे
अशा
सत्याग्रहीला भित्रा कोण म्हणेल? सत्याग्रहींनी ब्रह्मचर्य पाळावं, गरिबीचं व्रत घ्यावं, सत्याची साधना करावी व अंगी निर्भयता बाणावी. ब्रह्मचर्य जो पाळत नाही त्याचा शक्तिपात होतो; असे गांधींचे विचार.
ख-या शिक्षणाचा अर्थ मनात सत्याची चाड निर्माण होणे हाच आहे. माणूस आणि निसर्गामध्ये सुसंवाद साधणारं शिक्षण हेच खरे शिक्षण. यंत्र संस्कृती हे महान पाप आहे. गांधींच्या 'हिंद स्वराज' मधल्या मुख्य विचारांची ही झलक आहे.
'डॉयलॉग्ज ऑफ प्लेटो' ह्या महाग्रंथाने पाश्चात्य संस्कृतीचा पाया रचला तसाच गांधी विचारांनी भारताच्या राजकीय संस्कृतीचा पाया रचला असे म्हणावे लागेल. गांधी माणसातल्या पारंपरिक, परिचित, स्वस्थ, शांत, गूढ तत्वाला हाक देतात. आधुनिकता अंगिकारली की ही तत्व लुप्त होतात; त्यामुळे गांधीवादी विचार, आधुनिकतावादी विचाराचा विरोधक ठरतो.
हेब्री
डेव्हिड
थोरो,
जॉन
रस्किन,
लिओ
टॉलस्टॉय
ह्या
तीन
विचारवंतांची पुस्तकं वाचून गांधी सर्वाधिक प्रभावित झाले होते. थोरोंचा 'Civil Disobedience' हा निबंध आत्मशक्ती, व्यक्तीची स्वायत्तता, सद्सद् विवेक बुध्दी, सत्याची चाड, शांततामय विरोध आणि दमनशक्तीचा वापर करणाऱ्या संघटित शासनाबद्दल तिटकारा, ह्या संकल्पनांना व्यक्त करणारा आहे. हा निबंध जगभरातल्या सत्याग्रही चळवळीचा जाहीरनामा झाला.
आदर्शवादी
विचारांची
शक्ती
त्यांच्या
गगन
भरारीत
तर
त्यांची
शोकांतिका
त्यांच्या
अव्यवहार्यतेत दडलेली असते. तेच गांधी विचारांचे झाले. चरखा की Laptop? ह्या प्रश्नाचं उत्तर आज सगळ्यांकडे तयार आहे; आणि ते आधुनिकतावादात दडलेलं आहे, गांधीवादात नाही.
संगीता
मुकुंद
पाटखेडकर.
१५/१२/२०१७.
No comments:
Post a Comment