ll श्री ll
नागपूर
दि. २१/२/२०००.
चि. सौ.
गीता हिला अनेक
सप्रेम शुभाशीर्वाद.
तुझे दि.
४/२/२०००
चे पत्र मिळाले.
मी २६ व
२८ जानेवारीला पत्रें
पाठविली असल्यामुळे उत्त्तर देण्याचा
आळस केला. माझ्या काव्याची स्तुती
वाचून आनंद झाला.
माणूस स्वभावतःच स्तुतिप्रिय
असतो. असे जरी
असले तरी तू
आणि चि. प्रमोद
कधीही कशाची विनाधार
स्तुती करणार नाहीत याची
मला पूर्ण जाणीव
आहे; आणि म्हणूनच
मला झालेला आनंद
तोंडदेखला नाही.
आता फेब्रुवारी
संपायला केवळ १
आठवडा उरला आहे.
चि. मृदुला, चि.
अमोल व चि.
विशाल अभ्यासावर भिडली
आहेत, असे तुझ्या
पत्रात आहे, याचा
विशेष आनंद. चि.
मृदुला M.A. होणार, चि. अमोल
इंजिनिअरिंग (तृतीय वर्ष) होणार
व चि. विशाल
B.SC.(Part-1) होणार ही कल्पनाच
किती आनंददायी आहे.
त्यांच्या प्रयत्नाला परमेश्वराने सुयश
प्रदान करावे ही हार्दिक
शुभेच्छा व अभीष्टचिंतन.
चि. विशालचा येत्या
दासनवमीला सोमवार दि. २८
फेब्रुवारीला जन्मदिन. तन्निमित्त त्याला
आमच्या हार्दिक शुभेच्छा व
अभीष्टचिंतन. बाकी सर्व
ठीक. कळावे. लोभ
असावा.
नुकतेच रचलेले काव्य
देत आहे.
शीलाची थोरवी
ज्यास जगी नाही
कोणी त्यास हरी
रक्षिताहे
ज्यास नाही वाली
कोणी त्याचा नाथ
राम आहे तोच
अवघ्यांचा रक्षणकर्ता, तोच प्रयत्नांना
सिध्दिदाता तोच दयावंत
करुणावंत, तोच विश्वा
प्रतिपाळिता ll१ll
अनेक राजे आले
गेले, अनेक धनवंत
झाले त्यांचे नावनिशाण
नुरले कोठे, श्रीराम
महिमा नित्य चाले
ज्ञानेश्वर संन्याशाचे पोर, छळ,
अपमान साहिला अपरंपार
ज्ञानेश्वरी रचिली त्यांनी, माऊलीच्या
जयजयकारे दुमदुमे अंबर ll२ll नेपोलियन,
अलेक्झांडर जगज्जेते जगी गर्जले
गाजले कृर, नृशंस
नरहत्यारे जुलमी राजे, प्रजेला
ज्यांनी व्यर्थ गांजले मर्यादा
पुरुषोत्तम राम, छत्रपती
शिवाजी अन् महात्मा
गांधी आदर्श राजा,
चारित्र्यवान नेता, म्हणून जग
त्याते वंदी ll३ll
'शीलम् परम् भूषणम्',
' सत्यम् शिवम् सुंदरम्'
येणेच गाठिजे मानवतेची सीमा
चरम
हाच जाणिजे मानवतेचा महान
धर्म
हेच ओळखावे सकल धर्मांचे
गुह्य मर्म ll४ll
सकल धर्म मानिती
शीलाचा महिमा सकल संत
गाती शीलाची गरिमा
सकल संत प्रतिपादिती
शीलाची थोरवी भाविक भगवद्भक्त
आळविती जशी भजना
अंती भैरवी ll ५
ll
चि. श्री.
मुकुंदराव, चि. मृदुला,
चि. अमोल व
चि. विशाल यांना
अनेक सप्रेम शुभाशिर्वाद.
चि. अरुण येऊ
शकला नाही. या
आठवड्यात अमेरिकन कंपनीचे अधिकारी
येणार आहेत, मागील
आठवड्यात चि. शरयूची
परीक्षा होती.
ll श्री
ll
नागपूर
दि. १३/३/२०००.
चि. सौ.
गीता हिला अनेक
सप्रेम शुभाशीर्वाद.
तुझे दि. ८/३/२०००
चे पत्र परवा
मिळाले. आज ती.
कै. नानाजींच्या निधनाला
तारखेनुसार आणि उद्या
फाल्गुन शुध्द नवमीला तिथीनुसार
६५ वर्षे पूर्ण
होतात. हा दिवस
मला तरी हा
देहसोस जाईपर्यंत विसरणे अशक्य
आहे; म्हणून उल्लेख
केला एवढेच. तुझ्या
उपरिनिर्दिष्ट पत्रातील माझ्या काव्यासंबंधीचे
प्रशंसोद्गार - त्यांना मी पात्र
नसलो तरी - वाचून
आनंद झाला.
चि. विशालचा वाढदिवस तुम्ही
थाटात साजरा केला
हे वाचून अत्त्यानंद
झाला व तन्निमित्त
तू तयार केलेल्या
खा-या, गोड
पक्वान्नांची नावे वाचूनच
तोंडाला पाणी सुटले.
दासनवमीच्या नऊ दिवसात
मी दासबोधाचे पारायण
करीत असे. परंतु
यंदा 'मनाचे श्लोक'
दासनवमीलाच पूर्ण वाचले. सर्व
मुलांना त्यांनी नेटाने चालविलेल्या
परीक्षेच्या तयारीप्रित्यर्थ हार्दिक धन्यवाद व
'सदासर्वदा देव सन्निध
आहे, कृपाळूपणे अल्प
धारिष्ट्य पाहे' या समर्थोक्तीचा
साक्षात प्रत्यय येतो आणि
त्यांना सुयश प्राप्त
होऊन ते उत्तरोत्तर
प्रगतिपथावर वाटचाल करुन यशाचे
मानकरी ठरोत अशी
आमची हार्दिक शुभकामना
व अभीष्टचिंतन.
चि. अरुण
नागपूरला सकाळी दि. २८
फेब्रुवारीला आला व
दि. १ मार्चला
सायंकाळी ७ ll च्या
विमानाने परत गेला.
त्या २ ll दिवसांच्या
अल्पभेटीने आम्हाला आनंद झाला.
तो दि. ६
मार्चला केरळमधील कोचीन या
शहरी निमंत्रणावरुन व्याख्यानाला
गेला, ते आटोपून
दि. ७ फेब्रुवारीला
मुंबईला परतला. आता चि.
शरयू व चि.
मंजिरीची परीक्षा सुरु आहे.
परवा रात्री त्याचा
फोन आला होता.
चि. सुधीर
१३ फेब्रुवारीला Santiago
या शहरी Conference मध्ये Paper वाचायला निमंत्रणावरुन
गेला होता. त्या
वैज्ञानिकांच्या परिषदेत १००० लोक
उपस्थित होते व
त्याचा संशोधनात्मक Paper प्रशंसापात्र ठरला. चि. आशुतोषची
सध्या Practical परीक्षा सुरु आहे.
ती दि. १५
मार्चला संपते. चि. श्रीनिवास
व चि. हृषीकेशची
१० वीची परीक्षा
सुरु असून ती
दि. १४ मार्चला
संपते. बाकी सर्व
ठीक. चि. श्री
मुकुंदराव व मुलांना
सप्रेम आशिर्वाद.
तुमचे - बाबा.
संगीता पाटखेडकर.
१२/४/२०१६.
No comments:
Post a Comment