llश्री
ll
नागपूर
दि. ३१/३/२०००
चि. सौ गीता
हिला अनेक सप्रेम
शुभाशीर्वाद.
तुझ्या मागच्या पत्रात 'इतक्या
बारीक अक्षरात काव्य
लिहिताना तुमच्या पाठीचा कणा
लागून आला असेल,
डोळे शिणले असतील,
आणि हात दुखले
असतील' असा उल्लेख
आहे. सुप्रसिध्द गुजराती
संतकवी नरसी मेहता
विरचित आणि महात्मा
गांधींचे आवडते काव्य - "वैष्णव जन तो
तेणे कहिए जो
पीड पराई जाने
रे परदुःखे उपकार
करे तो जो
मन अभिमान न
आणी रे" - यात
वर्णिल्याप्रमाणे तू माझे
शारिरिक दुःख तर
यथातथ्य जाणलेस पण ते
सहन करुनही मी
तुला स्वरचित काव्य
पत्रातून लिहितो, याचे कारण
मला त्याद्वारे जे
आंतरिक समाधान मिळते त्यात
दडले आहे.
"येथे समस्त
बहिरे बसतात लोक
का भाषणे
मधुर तू करिसी
अनेक
ते मूर्ख
त्या मुळि नसे
किमपी विवेक
कोकीळवर्ण बघुनी म्हणतील
काक"
या पिकान्योक्तीत
किंवा 'अरसिकेषु कवित्व निवेदन
l शिरसि मा लिख
l मा
लिख l मा लिख'
l - या कवीच्या उद्गारात कविमनाची
एकच खंत आहे,
तीच खंत माझ्याही
हृदयात वास करते;
म्हणून मी तुला
माझे काव्य पत्रांतून
पाठवितो.
तू रसिक,
रसज्ञ व उत्तम
समीक्षक आहेस, याची मला
जाण आहे.
'झाडाला जशी पालवी
फुटते तसे कवीला
काव्य स्फुरावे, त्यात
आंतरिक अनुभव साठविलेला' असे
तू लिहिले ते
अक्षरशः सत्य आहे,
म्हणूनच नवनवोन्मेषशालिनी असे विशेषण
प्रतिभेला लावण्यात येते.
दि. १३
मार्चचे पत्र मिळालेच
असेल. त्याच दिवशी
लिहिलेले काव्य गुढीपाडव्याची भेट
म्हणून पाठवितो.
वृथा चित्तक्षोभ
फलाशाविरहित कर्म करा
रे, अहंकारा नच
द्या थारा षड्रिपु मोठे खट्याळ
भारी नच लागू
द्या त्यांचा वारा
द्रव्य, दारा अन्
प्रसिध्दी यांचा हव्यास नका
धरु शब्दस्पर्शादि पंच
विषय हे यांच्या
भूली नका भरु ll १
ll
साधनशुचिता अवश्य राखा
द्रव्यार्जनि नित्य प्रलोभनाते
भुलू नका कधी
पाळा पथ्य हे
अगत्य आमीषाते
भुलला जो नर
जाळ्यातचि तो खास
अडकला इहपरलोकी भ्रष्टाचारी
पतित तो खासचि
ठरला ll २
ll अरे मना, अरे
मना, ऐक माझे
जरा तरी नको होऊ
आत्महत्यारा भुलू नको
भलत्याच भरी
अरे मना, अरे
मना हाच माझा
तुला इशारा बुडत्याचा पाय डोहातचि
जाईल, सावधान, फिर
माघारा ll ३
ll प्रपंची
लबाड, परमार्थी खोटा,
संगती समर्थ रामदास होई
सावध, सावधान तू
रे, नको धरु भलतीच
आस चित्तशुध्दीयुक्त
अंतःकरणे घे नामस्मरणाचा
ध्यास सार्थ अपुले
जीवन कर बा,
सोडु नको भक्तीमार्ग
कास ll ४ll
वेळीच सावध होई
प्राण्या, मग पस्तावुन
काय लाभ?
साप निघून
गेल्यावरती, भुई झोडपून
काय लाभ?
पाखरांनी शेत फस्त
केल्यावर जतालीचा काय लाभ?
नरजन्म सारा व्यर्थ
घालविला, अता कशाला
वृथा चित्तक्षोभ ll ५ ll
दि. ५
एप्रिलला गुढीपाडवा आहे. हे
वर्ष सर्वांना सुखसमाधान,
समृध्दी, सुयश व
आरोग्याचे जावो. बाकी सर्व
ठीक.
तुझे - बाबा.
बाबांच्या या कवितांविषयी
मी पत्रांतूनच जे
काय लिहिले होते,
ते मी जवळ
टिपून ठेवले नव्हते.
ती माझी पत्रें
आता कुठे आहेत
हे मला माहीत
नाही. बाबा असतील
तोपर्यंत त्यांनी ती राखून
ठेवली असणार; पण
नंतर खूप फेरबदल
झाले त्यात त्या
पत्रांकडे कोण लक्ष
देणार? असो.
एक व्यक्ती
गेल्यानंतर बाकीच्यांच्या आयुष्याची खूपच फरपट
होते हा अनुभव
सर्वांनाच आहे.
प्रमोदजवळही बाबांची खूप
पत्रें असणार. अरुण जवळही,
राजू जवळही! प्रमोदजवळील
बाबांच्या पत्रांचे राखण झाले
आहे की नाही;
माहीत नाही, पण
अरुण व सुधीरजवळ
पत्रें असणार! त्यात अशी
काही लक्षणीय पत्रें
असल्यास त्यांनीही ती प्रसिध्द
करावयास हरकत नाही.
ब-याच
घटना विस्मृतीत गेल्या
असतात. बाबा सविस्तर
सर्व गोष्टींचा तारीखवार
उल्लेख करीत असल्यामुळे
त्या त्या घटना
वाचताना आपल्याला पुनःप्रत्ययाचा आनंद
मिळतो. उदाहरणार्थ - खालील पत्रं बघा
-
ll श्री
ll
नागपूर
दि. १२/८/२०००
चि. सौ.
गीता हिला अनेक
सप्रेम शुभाशीर्वाद.
चि. विश्राम
आषाढी एकादशीला पंढरपूरला
बँकेच्या कामाकरिता होता. त्याच्याबरोबर
चि. सौ. वीणाही
गेली होती. ती
काही दिवस राहून
नागपूरला परत आली.
चि. विश्रामला तेथेच
राहावे लागले म्हणून तो
आईच्या अमृतमहोत्सवाला नव्हता. तेथून त्याला
जालन्याला जावे लागले.
तेथील काम आटोपून
तो पुण्याला गेला.
तेथून दि. ९
ला नागपूरला आला.
दुसऱ्या दिवशी दि. १०
अॉगस्टला माझा ८५
वा वाढदिवस होता.
मी त्याला दि.
११ ला द्वादशीला
जेवायला सांगितले. तो म्हणाला,
'दि. ११ ला
तुम्हीच माझ्या घरी या,
मी सत्यनारायण करणार
आहे.'
आम्ही दोघे दि.
११ ला सकाळी
८ ला घरची
देवपूजा व नैवेद्य
आटोपून त्याच्याकडे गेलो. तो
सत्यनारायण पूजा आटोपून
बँकेत गेला. दुपारी
१२ वा. तो
सुट्टी काढून आला. त्याच्यासह
आमचे जेवण झाले.
बासुंदी- पुरी, भजे, दोन
भाज्या असे जेवण
होते. दिवसभर तेथेच
राहिलो. संध्याकाळी चि. श्री.
आमोदराव, चि. सौ.
वृंदा, चि. विजया
व आशुतोष, श्रीनिवास
तीर्थप्रसादाला आले. सौ.
वीणा व सौ.
वृंदा यांनी आम्हाला
औक्षण केले. आम्ही
रात्री ८ वा.
आपापल्या घरी परतलो.
चि. अरुण दिल्लीची
Conference आटोपून मुंबईला परत आला.
पण तेथे अमेरिकेचे
delegates आल्यामुळे १५ दिवस
त्याला तेथेच राहावे लागले.
त्यानंतर ते सर्व
नागपूरला येतील. दि.
१५/८ ला
राखी पौर्णिमा आहे.
तत्प्रित्यर्थ चि. अमोलला
त्याच्या वाढदिवसाप्रित्यर्थ हार्दिक शुभेच्छा व
अभीष्टचिंतन. तुझे दि.
७ चे पत्र
मिळाले. आनंद झाला.
चि. अरुण त्याच्या
नवीन घरात राहायला
जाऊन ६ महिने
झाले. त्याच्या नवीन
घरात अजून फोन
आला नाही. तो
अॉफीसमधून किंवा बाहेरुन फोन
करतो. पत्रव्यवहार नाही.
आम्ही चि. राजूला
अजून एकही पत्र
पाठविले नाही. तो दर
रविवारी फोन करतो.
आमच्याकडे S.T.D. नसल्यामुळे आमचा प्रमोदशी
अजून पत्रव्यवहारच सुरु
आहे. बाकी सर्व
ठीक. आमच्या तब्येती
वयोमानाच्या तुलनेत ब-या
आहेत. काळजी नसावी.
श्री. चि. मुकुंदराव,
चि. मृदुला, चि.
अमोल व चि.
विशाल यांना अनेक
सप्रेम शुभाशीर्वाद. चि. हृषीकेश
मागे पुण्याला interview करिता
गेला होता. आता
तो written test साठी पुण्याला
त्याच्या मित्राच्या मालकाबरोबर आज
सकाळी गेला आहे.
Test दि. १३ ला
आहे. दि. १४
ला परत येईल.
चि. विश्राम आता
येथेच राहणार आहे.
तीन-साडेतीन वर्षे.
तो बँक अॉफ
बडोदा धरमपेठ रिजनल
शाखेत सिनियर Manager पदावर
रुजू होईल.
तुमचे - बाबा.
संगीता पाटखेडकर.
१३/४/२०१६.
No comments:
Post a Comment