Sunday, 13 March 2016

हांस पोटभर



    कोण कुणाचे सोबती
  याच जन्माचे फक्त सर्व साथी
इतके प्रेम केले सर्वांवर, पण आपण शेवटी एकटेच, हीच का आपली नियती?
 येतानाही एकटेच आणि जातानाही, मग कशाला जमविले एवढे सखेसांगाती?
  काय ह्या जीवनाचा अर्थ?
 राहणार का सर्व इथेच?
काहीच कळत नाही - काय होणार? कसे होणार? सर्वच प्रश्नचिन्ह?
कशाला आलो इथे? काय हे सर्व अवडंबर? काहीच जर आपले नाही तर का म्हणून गुंततो आपण, व्याकूळ होतो आणि एक दिवस 'सर्व संपले' असे लोकांनी म्हणायचे?
शिल्लक काय राहणार?
तू केलेली चांगली कर्मे तुझ्याबरोबर येणार! लोकांच्या स्मरणात राहणार!
तुझ्या नाही का स्मरणात इतरांच्या अनेक गोष्टी! तसेच तुझेही होणार! हांस पोटभर.
चिरंतन, निरंतर, अनादि अनंत हे नुसते शब्द नाहीत, ते तुझेच स्वरुप, याची घेतेस ना तू प्रचिती! मग कशाची खंत आणि कशाची ख्याती
नेहमी प्रसिध्दच ना भर्तृहरी आणि भवभूती
'कालोह्ययं निरवधिर्विपुलाच पृथ्वी', हीच तर दिगंती ख्याती दिगंती ख्यातीचा ध्यास कशाला?
अनंत चतुर्दशीच्या दिवशी जो धागा अर्पितात तीच तर तू 'अनंती'
हांस, हांस, हांस, खळखळून हांस
हीच तुझी तुला विनंती!

      संगीता पाटखेडकर.
      १२/३/२०१६.

No comments:

Post a Comment