गोष्ट कधीच संपत
नसते
ती अनादि
अनंत असते
गोष्ट ऐकण्यासाठी कान टवकारलेलेच
असतात
अगंबाई?
अरेच्या! इश्य! हो का,
काय झाले? कधी?
कुठे? कसे काय?
याला अंतच
नसतो!
मला काही सांगायचय!
असे प्रत्येकाचेच!
म्हणून तर बाडेच्या
बाडे तयार होतात.
कथा होतात,
दंतकथा होतात, भारुडे होतात,
नाटके, काव्ये होतात, त्यांचे
इतिहास होतात, इतिहासाची पुनरावृत्ती
होते. आवृत्तींच्या आवृत्ती
होतात.
अनेक व्यक्तींच्या
अनेक गोष्टी; कारण
व्यक्ती तितक्या प्रकृती
व प्रवृत्ती.
एकाची गोष्ट दुसऱ्यासारखी नसते,
म्हणूनच तर त्यात
गंमत असते, म्हणूनच
तर आs वासला
जातो, हं. हं.
हं. केले जाते.
पुढे काय? चे
आकर्षण नेहमीच!
गोष्टींना अगदी पेव
फुटतो.
गच्चीवरच्या गोष्टी रंगतात.
कट्ट्यावरच्या गोष्टींना ऊत येतो.
अगदी कुजबुजतही
गोष्टी चालूच असतात.
मोठ्यामोठ्याने, तावातावानेही त्यांचे अवतार होतच
असतात.
मग ब्रह्मा-नारदच कशाला?
कृष्ण-अर्जुनच कशाला?
व्यास-गणपतीच कशाला?
झाडे, फुले, पशू, पक्षी,
दगड, विटा, माती
काहीही त्या गोष्टीत
अंतर्भूत होत असते.
काहीच वर्ज्य नाही,
आविष्कार सतत चालूच!
मग कौस्तुभ-वैजयंतीच्या
लग्नाची गोष्ट असो की
तिथे जमणा-या
सा-या व्यक्तींची
असो - काय? कसे?
चे आकर्षण सरतच
नसते! अगदी गजबजाट,
कलकलाट, आणि उत्साहाने
प्रत्येकजण सांगतच असतो! सांगणारे
सांगतात, ऐकणारे ऐकतात व
तेही सांगतच सुटतात!
लग्नानंतर काय? ची
उत्सुकता असतेच!
पुढे काय?
कधी संपणारच नसते.
व्यक्ती अनंत - गोष्टी
अनंत, म्हणूनच नेहमीच
आणि केव्हाही, झोपेतही
माणूस बडबडतोच. स्वप्नेही
पडतात.
काय हे?
संपणे नाहीच! म्हणूनच
तर जग चालू
आहे.
गोष्ट अत्यंत आवडती, उत्सुकता
शिगेला पोहचवणारी! भूकतहान हरपवणारी!
कधी संपूच नये वाटणारी!
म्हणून तर खंडच्या
खंड निर्माण होतात.
लायब्र-या तयार
होतात. सिरियल्स निघतात, मालिकांना
खंड नसतो! प्रतिक्रियांना
भरते येते. एकूण
काय? गोष्ट कधीही
संपत नसते; म्हणून
ती दिगंत, तिन्ही
त्रिकाळ, अव्याहत, आणि उत्स्फूर्त
असते.
गोष्टीवेल्हाळामुळेच नदीचे मूळ व
ऋषीचे कूळ शोधले
जाते; शोध लागतात.
पृथ्वी पालथी घातली जाते.
आकाशसंचारी माणूस होतो.
धांडोळा जीवनाचा
वेध आयुष्याचा
किती सांगायचय
मला - संपणारच नसते.
पुराण, प्रवचन,कीर्तन,
आख्यान, व्याख्यान - शोध, प्रतिशोध,
अखंडित.......
हेच तर
जीवन.
जीवनाची उत्सुकता कधीच
संपणार नसते, म्हणून गोष्टीला
कधी मरण नसते.
मरणांच्याही गोष्टी होतात!
म्हणून त्या अमर
होतात!
थांबतेस का आता?
किती कामे राहिलीत!
कामांच्याही
किती गोष्टी? लिहायच्यात
ना!
किती पाल्हाळ
लावतेस?
मुद्दा आला लक्षात लोकांच्या!
थांब आता!
फोनवर फोन! का
थांबलीस?
काय करावे
या गोष्टींना? बाप
रे बाप!
संगीता पाटखेडकर.
१६/३/२०१६.
No comments:
Post a Comment