Friday, 4 March 2016

खरी ओळख

   निरासक्तीचा निदिध्यास l
  स्वरुप ओळख तुझे l ठेव विश्वास l
तुझे आहे तुजपाशी l दिसणार तुला खास
हव्यासाचा गुंता फार झाला l
  सोडव झटपट l हो मोकळी
घे पतंगभरारी l आकाशाच्या पलीकडचा l दृष्टीक्षेपात येणार हमखास l अनासक्ती हा आहे कर्मयोग, तो बनव जीवनयोग 'योगः कर्मसु कौशलम्' हा ठरेल योगायोग जे आपण इच्छितो ते कधी ना कधी मिळत असते हा अनुभव अनेकांचा त्या दिशेने मार्गक्रमण, परिभ्रमण, ठेचकाळणे, गडबडणे घे अनुभव विश्वरुपांच्या वैशिष्ट्यांचा पर्वतशिखर गाठण्यासाठी तयारीची सिध्दता तर हवीच ना! पर्वत नुसता चित्रात पाहून काय उपयोग? त्या पर्वताच्या पायथ्याशी तरी जाशील ना?
नुसत्या लंब्याचवड्या गोष्टींनी काहीच होणार नाही लळत-लोंबकळत का होईना गिर्यारोहण कर ना!
अडीअडचणींना सामोरे गेल्याशिवाय वाढत नाही मनोधैर्य हनुमानाने तर जन्मताच हाती कवटाळण्याचा प्रयत्न केला सूर्य त्याच्या झेपेची सर सर्वसामान्यांना कुठे?
गरुडझेप नाही पण साधी उडी तरी मारु शकशील ना?
  तत्वज्ञानाच्या बाता करणारे भोंदू
'ऐसे गुरु अडक्याचे तीन मिळाले तरी त्यजावे' म्हणणारे तुकाराम नजरेसमोर ठेव धृवतारा l घे उदंड भरारी म्हणजे समोरच तुझ्या 'मोरपिसारा'
मोरपीस धारण करणारा बघण्याचे सामर्थ्य येऊ दे दृष्टीत त्याची सारी हीच तर इच्छा आहे l त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न हवा 'कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन' हाच त्याचा मंत्र आणि हेच जीवनतंत्र अनेक रुपगुणांतून व्यक्त होण्याचा तो प्रयत्न करतो, त्या अनेकांतील एकत्व बघण्याचा निदिध्यास हवा!

     संगीता पाटखेडकर.

     //२०१६.

No comments:

Post a Comment