'जेथे नेति
नेति श्रुति l तेथे
न चले भाषावित्पत्ती
l परब्रह्म आदिअंती l अनुर्वाच्य' - दशक
८, देहान्त निरुपम
नाम, समास - दशम,
५० वी ओवी.
रामदास ही एक
विलक्षण गुणवैशिष्ट्यांनी युक्त अशी व्यक्ती
आपल्या महाराष्ट्रात ४०० वर्षांपूर्वी
होऊन गेली. लग्नमंडपातून
'सावधान' होऊन ते
सा-या आयुष्यात
इतरांना जीवन-सावध
बनविण्यासाठी निरनिराळ्या प्रकारे कष्टत
राहिले. वृत्तीने संत असलेला
हा माणूस जीवनापासून
पळपुटा नव्हता; तर 'अखंड
प्रयत्न' कशाला म्हणतात याचा
परिपाठ त्यांनी निर्माण केला.
त्यांचे जीवनकार्य ४ शताब्दी
उलटून गेल्यानंतरही अजूनही
प्रेरणादायक ठरावे हे किती
नवल! रामदासांनी इतकी
साहित्यसंपदा निर्माण केली की,
आणि इतकी आचारशील-विचारशील-कृतीशील की,
त्यांच्यानंतर कुणी काहीही
लिहिले नसते तरी
चालले असते असे
व.पु.काळे
म्हणतातच ना! ४००
वर्षे आपल्या कृतीने,
आपल्या साहित्यसंपदेच्या भाषाप्रभुत्वाने समाजमनावर अधिराज्य गाजविणे
ही मुळीच मामुली
गोष्ट नाही. रामदास
हा मराठीतील 'भाषाप्रभू'
कवी आहे. मुसलमानी
वर्चस्वाच्या काळात स्वतःचे रक्षण
करणे जिथे कठीण
तिथे सर्व निर्मिती
अशा पध्दतीने जतन
करणे हे तर
कार्य महाकठिणच! पण
जे सर्वश्रेष्ठ आहे
ते टिकून राहतेच.
आदर्श व्यक्तिमत्वे काळाच्या
उदरात लौकिक दृष्टीने
गडप झाली तरी
त्यांच्या कार्याचा ठसा अमिट
असतो. कालातीत वाङ्मय,
विदग्ध वाङ्मय, अक्षर वाङ्मय
असे शब्दप्रयोग निव्वळ
भाषाप्रयोग ठरतात. या सर्वांच्या
पार त्यांच्या अक्षरांची
महती असते.
भाषावैभवाचे काही नमुने
बघा.
'खटखट खुंटून
टाकावी l खळखळ खळांसी
न करावी l खरे
खोटे खवळो नेदावी
l वृत्ती आपुली'
'टमटम टम टम
लावू नये l कंटाळवाणी
ढिसाळ ढाला ढळती
कुंचे l ढोबळा ढसकण डुले
नाचे l ढळेचिना ढिगढिगांचे l कंटाळवाणे'
'फुकट फाकट फटवणे
नाही l फटकळ फुगडी
पिंगा नाही l फिके
फसकट फोल नाही
l भका द्या निंदा
l रुप लावण्य अभ्यासता
न ये l सहजगुणास
न चले उपाये
l काहीतरी धरावी सोये अगांतुक
गुणांची' l
शब्द म्हणजे
भावना व्यक्त करणारे
एक साधन! त्यांच्या
हातचा मळ - शब्दांना
तुकविणे! कितीतरी वचने 'सुभाषिते'
ठरली.
'जिता सार्थक
नाही केले l वेर्थ
आयुष्य निघोन गेले l मुळी
धान्याचे नाही पेरिले
l ते उगवेल कैचे'
l - सगळा भर जीवनाचे
कल्याण करा हे
सांगण्यासाठी. सगळा आटापिटा
मनुष्य जीवनाचे सार्थक करा
हे पटविण्यासाठी!
समर्थभक्त व तबलावादक
श्री. गिरीश सातोनकर
यांनी मागील काही
वर्षांपासून श्रीक्षेत्र 'जांब' या श्रीसमर्थ
जन्मभूमीत दासबोध पारायणाचा उपक्रम
चालू केला. पारायणाबरोबर
कीर्तन, प्रवचन आणि गायन
सेवेचेही आयोजन केले जाते.समर्थ रामदासस्वामी प्रतिष्ठानच्या
माध्यमातून. त्यांनी श्रीमत् ग्रंथराज
दासबोधाची, मनाचे श्लोक, आत्माराम
व करुणाष्टकासह पारायण
प्रत उपलब्ध करुन
दिलेली आहे. यावर्षी
मला घरी दासबोधाचे
पारायण करण्याचे सौभाग्य लाभले.
सज्जनगडावर रामदासनवमी निमित्ताने मोठा
उत्सव होत असतो.
प्रत्येकजण आपापल्यापरीने या महान
पुरुषाला श्रध्दांजली अर्पण करीत
असतो. ३ मार्चला
रामदासनवमी आहे. तुकाराम
हे रामदासांचे समकालीन!
४०४ जयंत्या उलटून
गेल्यावर या लोकांचे
समाजमनावरील अधिराज्य त्यांच्या लेखनामुळे
आहे हे विसरुन
कसे चालेल? भाषेची
समृध्दता व सामर्थ्य
त्यांनी समाजहितासाठी असे हाताळले
की त्यांची वचने
लोकमानसाच्या अंतरंगात जाऊन दृढ
स्थिरावली!
आज गजानन
महाराज प्रकटदिन आहे. असे
म्हणतात की रामदासांचा
पुढील अवतार म्हणजे
श्रीसंत गजानन महाराज. गजानन
महाराजांच्या स्वरुपात रामदासस्वामींनी भक्तांना
भेट दिल्याचा उल्लेख
गजानन महाराजांच्या पोथीत
आहे.
शिवाजीचा गुणगौरव रामदासांनी
ज्या प्रकारे केला
आहे, त्यातून त्यांची
'भाषा' प्रवाही, ओजस्वी व
तेजस्वी तर जाणवतेच
पण व्यक्तिचित्रणाचे कौशल्य
ठळकपणे मनावर बिंबते.
'निश्चयाचा महामेरु l बहुत
जनांसी आधारु l अखंड स्थितीचा
निर्धारु l श्रीमंत योगी l नरपती
हयपती गजपती l गडपती
भुपती जळपती l पुरंदर
आणि शक्ती l पृष्ठभागी
l यशवंत कीर्तीवंत l सामर्थ्यवंत वरदवंत
l पुण्यवंत नीतीवंत l जाणता राजा
l आचारशील विचारशील l दानशील धर्मशील
l सर्वज्ञपणे सुशील l सकळाठायी l धीर
उदार गंभीर l शूर
क्रियेसी तत्पर l सावधपणे नृपवर
तुच्छ केले l देव
धर्म गोब्राह्मण l करावया संरक्षण l हृदयस्थ
झाला नारायण l प्रेरणा
केली l या भूमंडळाचे
ठायी l धर्मरक्षी ऐसा नाही
l महाराष्ट्र धर्म राहिला
काही l तुम्हा कारणे l कित्येक
दुष्ट संहारिला l कित्येकासी
धाक सुटला l कित्येकास
आश्रयो जाहला l शिवकल्याण राजा'
l
साहित्याची खाण म्हणजे
रामदासांचे वाङ्मय! सगळ्यांना अमर
करण्याचे सामर्थ्य त्यांच्या साहित्यसंपदेत
आहे. 'अनुर्वाच्य' हा
शब्द कसा सुरेख
मनात घर करुन
राहणारा आहे की
नाही?
'शब्दसामर्थ्याचा वेद' जीवन-वेद बनविण्याची
किमया रामदासांनी खचितच
साधली आहे.
संगीता पाटखेडकर.
१/३/२०१६.
No comments:
Post a Comment