"यावत् जीवेत् सुखं
जीवेत्
नास्ति मृत्योरगोचरः
भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं
कृतः"
(जोपर्यंत जगायचे तोपर्यंत
सुखाने जगावे, मृत्यू कोणालाही
सुटला नाही. देहाचे
भस्म झाल्यावर जन्म
कोठून मिळणार?)
चार्वाकाच्या तत्वज्ञानाची स्थूलपणे सूत्रे अशी -
१) देव
अस्तित्वात नाही
२) स्वर्ग
आणि नरक नाही.
३) पूर्वजन्म
आणि पुनर्जन्म नाही.
४) माणसाने
पैसा व साधने
धार्मिक कर्मकांडात किंवा प्रार्थनेत
फुकट न घालवता
चांगले जीवन जगावे.
उपभोग घ्यावा.
५) आयुष्याचे
ध्येय मोक्ष नसून
सुखासाठी यत्न करणे
आहे.
६) पृथ्वी,
वायू, पाणी आणि
तेज या मूलतत्वांनी
चैतन्यनिर्मिती होते.
चार्वाकाच्या मते, डोळ्यांना
दिसणारी सृष्टी खोटी कशी?
जड हीच मुख्य
वस्तू आहे. इंग्रजीमध्ये
ज्याला 'Down to Earth' असे तत्वज्ञान
म्हणता येईल, असा चार्वाकदर्शनाचा
अर्थ निघतो. त्याच्या
तत्वज्ञानात अर्थशास्त्रीय व सामाजिक
विचारांनाही स्थान आहे. चार्वाकाला
समानार्थी म्हणून 'लोकायत' हा
शब्दही वापरतात. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री
जोशी यांच्या मते
पहिला इहवादी भारतीय
विचार म्हणजे चार्वाकाचे
लोकायत दर्शन! चार पुरुषार्थांपैकी
अर्थ व काम
हे दोनच पुरुषार्थ
हे दर्शन मानते.
शेती, गोरक्षण, व्यापार,
राजनीती इ. चांगल्या
उपायांनीच पृथ्वीवरील सुखे भोगावीत.
ईश्वर म्हणून राजाचीच
सेवा करावी.
भौतिक, ऐहिक जगात
वावरण्यासाठी याच तत्वांनुसार
वागणारा माणूस व्यवहारी, शहाणा
ठरतो. आध्यात्मिकतेच्या पातळीपर्यंतचा
विचार करण्याची क्षमता
आणि कुवत ९९%
लोकांत नसतेच समजा. तो
जो १% असतो
तोही त्या पारमार्थिकतेच्या
उच्चतम श्रेणीला पोचू शकतो
की नाही हे
शेवटी रामभरोसेच! अशा
सर्व शक्यतांचा विचार
करता चार्वाक दर्शनांची
तत्वे अंगिकारणे सहजच
सुलभ जाते.
२१ व्या
शतकात आज जी
आपल्याला वैज्ञानिक प्रगती झालेली
दिसत आहे ती
पारमार्थिक विचारांचा माणूस करु
शकेल का? राहायला
जास्तीतजास्त चांगले घर हवे!
मग त्यासाठी तितकी
धनसंपदा हवी. मोटार,
विमान, जहाजसुध्दा स्वतःच्या मालकीचे
हवे. यादृष्टीने सगळ्या
कंपन्यांचा जो विस्तार
झाला तेथे जास्तीतजास्त
भौतिक समृद्धी असल्याशिवाय
पुढचे पाऊल टाकताच
येत नाही. सुवेझ
कालव्याचे आपण उदाहरण
घेऊ.
फर्डिनंड डि लेसेप्सने
संपूर्ण जगाच्या राजकारणावर परिणाम
करणारा सुवेझ कालवा निर्माण
केला. पुढे त्यानेच
केलेला पनामा कालव्याचा प्रयत्न
मात्र फसला, नंतर
अमेरिकेने पुढाकार घेऊन पनामा
कालवा बांधला. पनामा
देश स्वतःच त्या
कालव्याचे नूतनीकरण करत आहे.
या दोन्ही कालव्यांमुळे
जलप्रवासातले हजारो मैलांचे अंतर
कमी झाले; पण
पैसा अलोट लागणार
ना या सर्व
निर्मितीत!
भूमध्य आणि लाल
समुद्रांना जोडण्याचे प्रयत्न पूर्वापार
चालत आले. फर्डिनंड
डि लेसेप्स या
फ्रेंच माणसाने हे शिवधनुष्य
पेलले. तो स्वतः
अभियंता नव्हता. राजकीय मुत्सद्दी
होता. ब्रिटिश सरकारला
सागरी वाहतुकीसाठी सुवेझ
कालवा फार फायद्याचा
ठरणार होता, पण
त्यांनी विरोध केला. शेवटी
ब्रिटन व इतर
सर्व संबंधित देशांची
मने वळविण्यात लेसेप्स
यशस्वी झाला. वीस कोटी
फ्रँक्सची गरज होती.
लेसेप्सने सुवेझ cannal कंपनी स्थापन करुन
तिचे समभाग विक्रीला
काढले. फ्रेंचांनी ५० टक्क्यांहून
अधिक समभाग विकत
घेतले. इजिप्तच्या सैद पाशाने
प्रचंड प्रमाणात समभाग खरेदी
केले व भांडवल
उभे झाले. लेसेप्सच्या दृष्टीने पूर्व-पश्चिम संस्कृतीला जोडणारा
पूल म्हणजे सुवेझ
कालवा! नामवंत अभियंते जमविले.
त्यांच्यासाठी घरांची, पिण्याच्या पाण्याची
सोय केली. वेठबिगारी
मजूर नको होते.
इस्माईल पाशाने वेठबिगारी रद्दच
करुन टाकली. १८६४
च्या सुरुवातीपासून नवीन
यंत्रसामुग्रीने आधुनिकीकरणाने बांधकाम झाले. जगभरातील
मान्यवर सुवेझ कालव्याला भेट
द्यायला येऊ लागले,
त्यात फ्रान्सची महाराणीही
होती. आता ब्रिटिशांचे
डावपेच चालू झाले.
व्यवस्थापनाचा प्रश्न उपस्थित झाला,
त्यांनी सुवेझ कालवाच विकत
घेतला.
२० व्या शतकाच्या
सुरुवातीला हा कालवा
ब्रिटिश साम्राज्याचा केंद्रबिंदू ठरला. कालव्याच्या
सुरक्षिततेचे निमित्त सांगून त्यांनी
आपली सत्ता अफगाणिस्तान,
पूर्व आफ्रिका, इराण
आणि मध्यपूर्वेत पसरविली
आणि पहिल्या महायुद्धानंतर
इजिप्तवर प्रत्यक्ष कब्जा केला.
लेसेप्सचा पनामा कालव्याचा प्रकल्प
अयशस्वी ठरला. पनामा cannal कंपनी
दिवाळखोरीत निघाली.
इजिप्तमध्ये अब्दुल गमाल
नासर याने सुवेझ
कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले. ब्रिटिश साम्राज्याची
ती मृत्यूघंटा ठरली.
सुवेझ कालव्यामुळे जहाजं
भारताच्या पश्चिमेला येऊ लागली
आणि मुंबईचं महत्त्व
एकदम वाढलं. ब्रिटिशांच्या
आर्थिक सत्तेचं केंद्र कलकत्त्याहून
मुंबईकडे स्थलांतरीत झाले. इतिहासाचा,
राजकारणाचा, समाजकारणाचा, एकूणच ऐहिक, भौतिक
जीवनसरणीचा विचार केल्यास आज
कोणतीही घटना जागतिक
होते. जग जवळ
आले आहे ते
या अर्थाने!
'अर्थस्य पुरुषो दासः'
म्हंटले जाते.
आर्थिक मजबुतीशिवाय कोणतीही
जीवनसरणी उभारताच येत नाही.
हा सर्व दिलेल्या
उदाहरणाचा निष्कर्ष!
चार्वाकाचे तत्वज्ञान भौतिक,
ऐहिक समृद्धीला चालना
देणारे असले तरी
अनाचार, भ्रष्टाचार, सुखोपभोगाची परिसीमा,
अशांती, रोगोपद्रव यांना कारणीभूत
ठरते; कारण सुखाला
परिसीमा नाही. सुखाला व्याख्येत
बसवता येत नाही.
'समाधान' हा शब्दच
तिथे नाही. जिथे
समाधान नाही तिथे
अशांतीची बजबजपुरी असणारच! नरक
म्हणतात तो हाच! शेवटी
आध्यात्मिक मार्गाचा पुरस्कार करणाऱ्यांना
ही अशांतीची पायवाट
नकोच असते; पण
हे सर्व समजेपर्यंत
खूप उशीर झालेला
असतो आणि एकदा
उखळात डोके घातल्यानंतर
वरुन मुसळाचे दणके
बसणारच! गत्यंतर नाही.
संगीता पाटखेडकर.
१६/३/२०१६.
No comments:
Post a Comment