शेख चिल्लीची
गोष्ट प्रसिध्द आहे.
तुपाचे भांडे डोक्यावर घेऊन
व्यवस्थित ठिकाणी पोचविले तर
एक श्रीमंत माणूस
त्याला खूप पैसे
देणार होता. शेख
चिल्ली अगदीच गरीब! त्याला
आपण हे काम
करु व येणाऱ्या
पैशात काय-काय
करु शकू याचा
विचार तो करु
लागला. बकरी विकत
घेऊ, दुधाचा धंदा
करु, नंतर होणाऱ्या
नफ्यात गाय घेऊ,
येणाऱ्या नफ्यात पुष्कळ गायी
घेऊ, डेअरीचा धंदा
करता-करता वेळ
अपुरा पडेल, खूप
पैसा मिळवू, घर
घेऊ, लग्न करु,
मुले होतील, घरी
आरामशीर राहू, मुलगा जेवायला
बोलवायला येईल आणि
मी त्याची गंमत
करीन, त्याला नाही
म्हणेन! असे म्हणून
शेख चिल्लीने डोके
हलविले व तुपाचे
भांडे खाली पडले.
सगळी स्वप्ने धुळीला
मिळाली! स्वप्नांचे इमले रचता
रचता वर्तमानाचा विसर
पडला. मर्ढेकरांचा 'गणपत
वाणी' आठवतो. गणपत
वाणी बिडी पिताना
- चावायाचा नुसतीच काडी; कारण
पैसे वाचवून 'माडी'
बांधायची त्याची इच्छा!
स्वप्नांच्या मनोराज्यात माणूस इतका
गुंग होतो की
परिस्थितीचे, वर्तमानाचे भान विसरतो
व जे मिळवायचे
तेही मिळत नाही.
आपल्याजवळ काय उपलब्ध
आहे यावर आधी
लक्ष केंद्रित करावयास
हवे! हवेत तीर
मारण्यात काय अर्थ?
एकाग्रता जर असेल
तर मध्येच ध्येय
विस्कळीत होणार नाही. कोळी
जाळे विणतो. तो
किती एकाग्र असतो!
त्याच्यापासून Concentration शिकायला हवे.
गाणारा गायक किंवा
खेळणारा खेळाडू कितीही
जमाव असला व
कितीही कल्लाहल्ला असला तरी
त्याच्या गाण्यावरचे व खेळावरचे
लक्ष विचलीत होऊ
देत नसेल तरच
तो यशस्वी होणार!
Jack Dempsey हा
अमेरिकन बॉक्सर! तो नेहमी
म्हणायचा, "Nobody is
going to stop me, nobody can really hurt me." एका
शर्यतीत त्याने त्याच्या विरोधकाला
चार मिनिटांत लोळविले
आणि $१००,०००
मिळविले. जमावाचा आवाज त्याच्यावर
काहीही परिणाम करत नाही
असे त्याचे म्हणणे
असायचे. द्रौपदी स्वयंवराचा पण
किती कठीण होता;
पण अर्जुनाने लक्ष्य
केंद्रित करुन तो
जिंकला.
अभिमान, वासना, प्रसिद्धीची
इच्छा, श्रीमंती, घाई या
गोष्टी माणसाला मूळ ध्येयापासून
विचलीत करणाऱ्या आहेत. माणूस
शांत चित्ताने तेव्हाच
विचार करु शकेल
जेव्हा बाकीच्या या गोष्टींवर
तो ताबा मिळवू
शकेल!
बुध्दीमत्ता, कार्यशैली, उत्तम आरोग्य
व उत्तम मन
याद्वारे कार्यकुशलता वाढते. वर्तमानात
जगणे, त्यासाठी परिश्रम
करणे, निष्ठापूर्वक प्रत्येक
अडथळा पार करण्याची
हिंमत ठेवणे - या
गोष्टी भविष्य आपोआपच
घडवितात. 'पेराल तेच उगवेल'
तेव्हा 'पेर्ते व्हा' हे
ब्रीदवाक्य महत्त्वाचे!
इतिहास घडून गेलेला
असतो. इतिहासातील व्यक्तींनी
इतिहास सिध्द केलेला असतो;
त्यातील प्रेरणादायी घटनांपासून निश्चितच
खूप काही शिकायचे
असते, पण त्यातच
अडकून पडायचे नसते.
आपल्याही हातून 'इतिहास' घडावा
असे काहीतरी निष्ठेने
करण्याला महत्त्व आहे.
इतिहासाला पालांडत, वर्तमानाला
ओलांडत जो भविष्यात
शिरतो तोच माणूस
चिरस्थायी होऊ शकतो.
पायवा महत्त्वाचा, इमारत
उभी होणेही महत्वाचे!
'कळस' लोकांचे लक्ष
वेधून घेणारच! 'आधी
कळस आणि मग
पाया' असतो काय?
पायवा आणि कळस
यात जो वर्तमान
आहे तो उजळून
टाकण्याची हिम्मत प्रत्येकाने दाखविली
तर एक सुखी
समाज आपोआपच अंकुरेल;
आणि या अंकुरण्याचा
वटवृक्ष होईल! हा वटवृक्ष
अनेकांना सावली देईल आणि
दीर्घकाळ प्रेरणा देईल!
संगीता पाटखेडकर.
३०/३/२०१६.
No comments:
Post a Comment