Saturday, 12 November 2016

भावनांचं गाव

     भावनांचंही एक 'गाव' असतं
      मनामनांत ते वसलं असतं
      मन नेईल तिथे ते जात असतं
      मनाचा ठाव ते घेत असतं
    
        कधी भावना प्रेमाच्या
       कधी भावना निखळ मैत्रीच्या
        कधी भावना सुखाच्या
        कधी भावना दुःखाच्या
       कधी भावना जाणिवेच्या
       कधी भावना आपुलकीच्या
       कधी भावना जखमा, वेदनांच्या
       कधी भावना धीर देण्याच्या
       कधी भावना जिद्द, चिकाटीच्या
       कधी भावना ज्ञान पिपासेच्या
        कधी भावना हक्काच्या
        कधी भावना  जिंकण्याच्या
      कधी भावना हार पचविण्याच्या
      ....अगणित अशा भावना मन
            वेढून घेत असतं
       भावनांचंही एक 'गाव' असतं

    कधी भावना उदात्त, मोठ्या मनाच्या
    कधी भावना आनंद वाटून घेण्याच्या
      कधी भावना पराक्रमाच्या
      कधी भावना देशप्रेमाच्या
    कधी भावना मनामनांना जिंकण्याच्या
       कधी भावना माणुसकीच्या
      सर्वांना आपलंसं करण्याच्या
      सारासार, नीतीनं वागण्याच्या
       डगमगता पुढे जाण्याच्या
      कधी भावना मन शुध्दीच्या
       मन पक्कं आणि घट्ट करण्याच्या
     कधी भावना अति उच्च विचारांच्या
     ....असंख्य अशा उच्चतम भावनांना
       मन अमरत्वाकडे नेत असतं
     अशा भावनांचं गाव आदर्श बनतं
     अशा भावनांच्या गावातील व्यक्तींना
      'महापुरुष' ते ठरवित असतं
      
      भावनांचंही एक 'गाव' असतं...
      भावनांचंही एक 'गाव' असतं....

   मृदुला मुकुंद पाटखेडकर.

     १२ नोव्हेंबर २०१६.

No comments:

Post a Comment