Friday, 4 November 2016

ऑक्सिजन

ऑक्सिजनशिवाय जीवन नाही. मनुष्य, प्राणी, पक्षी, छोटे छोटे जीव, जंतू, या सर्वांनाच श्वासागणिक श्वास भरपूर प्रमाणात नैसर्गिकरित्या पुरवितो तोक्सिजन म्हणजेच प्राणवायू. निरोगी असतांना प्रत्येक घेतल्या जाणाऱ्या श्वास आणि उच्छ्वासांचा आपण गंभीरपणे विचार करत नाही; कारण ती प्रक्रिया अगदी सहज आणि सुलभ होते, परंतु जेंव्हा काही कारणाने आपला श्वास जड झाला, रोखल्या गेला तरच आपल्याला मिळणाऱ्या एकेका श्वास वरदानाचं महत्त्व पटतं. ऑक्सिजनचा पुरवठा अधिकाधिक काळपर्यन्त लाभणा-या व्यक्ती दिर्घायुष्याचे धनी असतात. दीर्घायुषी व्यक्ती आणि तीही निरोगी जीवन जगत असेल तर सोन्याहून सुंदर!!!


   वातावरणातून, निसर्ग सान्निध्यातून आपल्याला भरपूर प्रमाणात प्राणवायू मिळतो. वर उल्लेखिला तो असतो नैसर्गिक प्राणवायूचा पुरवठा!! निसर्ग, झाडे, फुले, पाने, यांच्याद्वारे आपल्याला बाह्य जगातून अॉक्सिजन मिळतो; पण यासाठी आपल्याला निसर्गाकडे वळावे लागते. घरोघरी तुळशी वृंदावनं यासाठीच तर लावली जातात. अखंड श्वासाश्वासाला प्राणवायूचं अविरत दान करीत असते तुळस!! घरातल्या स्त्रियांची तर ती सखीच बनते. पूर्वीच्या काळी स्त्रिया मुद्दाम तुळशीजवळ बसत असत. तिच्याजवळून प्राणवायू घेता घेता आपल्या मनातील सुखदुःखाच्या गुजगोष्टी तिलाच सांगत असत. छान फुललेली, मंजि-या बहरलेली तुळस अंगण परिसराला सुगंधाने जसे भारुन टाकते तसेच आपल्या श्वासांनाही सुगंधी करते.
    काही वर्षांपूर्वी मी एका जगदंबा माता मंदिरात गेली होती. अर्थात माझे शहर अकोल्याच्याच!! त्या मंदिर प्रांगणात, दुसरी कोणतीच झाडे लावली नव्हती. सगळीकडे तुळशीबनं होती. दृश्य फारच विलक्षण आणि मनोहारी होते. दर्शनाला येणाऱ्यांना तिथून जावेसे वाटत नसे. या तुळशींची काळजी घ्यायला मंदिर परिसराजवळ राहणाऱ्या एका माळ्याची पुजा-याने व्यवस्था केली होती. योगायोगाने मी दर्शन घेऊन बाहेर आली तेंव्हा तो माळी तिथेच अगदी प्रेमाने, हळूवार, अलगद मंजिरींना स्पर्श करीत होता. खूप मोठ्यामोठ्या, झिलमिल, झुलणा-या, डोलणा-या मंजि-या होत्या तेथील तुळशींना!!! मी माळ्याजवळ गेली आणि त्यांना म्हणाली, 'माळी काका, सगळ्यात जास्त प्राणवायू तर रोजच तुम्हाला मिळतो'!! हे ऐकून माळ्याचा चेहरा फुलारला तो 'होव नं जी ताई'!!!! असं आनंदाने म्हणाला.

   वडाच्या झाडामुळेही आपल्याला अनेक पिढ्यांना पुरेल इतका प्राणवायू मिळतो. एखाद्या मोठ्या प्रांगणात, आपल्या घराजवळ वडाचे झाड असेल तर दूरपर्यन्त राहणाऱ्यांना भरपूरक्सिजन मिळतो
  
    बळ देणारा, चैतन्य जागविणारा, शरीर मनाला सतत प्रफुल्लित आणि उत्साही ठेवतो तो असतो अस्सलक्सिजन. उत्साह, चैतन्य, मनोबल वाढविणा-या आणखी एका महत्त्वपूर्णक्सिजनची आपल्याला सतत गरज असते; अशा एका विचाराने आज मनात घर केले. असा हा अॉक्सिजन कुठून आणि कसा मिळतो?? याचा विचार मन करु लागले. आज अॉक्सिजन या शब्दानेच मला भरपूर प्राणवायू मिळाला.
  ..... तर हाक्सिजन आपल्याला मिळतो आपल्याच कुटुंबातून. कोणे एकेकाळी एक 'तो' अनोळखी आणि एक 'ती' अनोळखी हे प्रेमबंधनात राहून विवाहबध्द होऊन नवरा बायको बनतात. काडी काडी जमवून आपले एक कष्टाचे घरकुल तयार करतात. दोघेही -या अर्थाने आदर्श संसार करतात. मुलांना नुसताच जन्म देत नाहीत तर त्यांना संस्कारक्षम बनवून मायेने वाढवितात, उच्च शिक्षण देतात जगामध्ये ताठ मानेने उभं राहण्यासाठी सिध्द करतांनाच; चांगल्या मुलांचे आईवडील म्हणून स्वतःलाही सिध्द करतात, सिध्द होऊन जातात. असे सिध्दहस्ते अखंड मायेचे वरदान आपल्याला देणारे आईवडील हे आपल्यासाठी अखंडक्सिजनचा स्त्रोत असतात. त्यांना त्यांच्या आईवडीलांकडून मिळालेलेक्सिजन ते आपल्याला देतात. कुटुंबातील भाऊ, बहीणी, एकत्र कुटुंबं असतील तर काका, काकू, आजी, आजोबा, मामा, मावशी, आपल्या आजूबाजूच्या परिसरातील, मित्र, मैत्रिणी, ज्यांच्याशी संवाद साधल्याने आपल्याला हलके आणि मोकळे वाटते असे काही प्रेमाचे, सौहार्दाचे संबंध असलेले लोक, चांगले शेजारी असतील तर ते, अशा अनेक अॉक्सिजन देणाऱ्या कुटुंब आणि मित्रमैत्रिणीरुपी वडाच्या अनेक पारंब्या आपल्याभोवती गुंडाळलेल्या असतात. ह्या एकेकाक्सिजनची किंमत अनमोल असते.

   आपण ज्या कुठल्याही क्षेत्रात काम करतो; त्या कामातून मिळणारा आनंद, आवडतं क्षेत्र किंवा छंद असतील, किंवा आपल्याला आवडणारे एखादे काम मिळाले असेल तरी त्या कामात आपलं मन झोकून देऊन; नावडते कामही आवडते करुन घेणेआपल्या कार्यालयीन परिसरातील अधिकारी वर्ग, ज्यांच्याकडून आपण बरंच काही शिकत असतो.... असे अनेकानेकक्सिजनचे पुरवठे आपल्याला नेहमी मिळत असतात. फक्त हा सर्व पुरवठा कुठून आणि कसा ग्रहण करावयाचा हे सर्व आपल्यावरच अवलंबून असते!!

    कितीही दिवसभर कामात गर्क असलो तरी आपल्या आई वडीलांशी काही वेळ बोलणे, त्यांची विचारपूस करणे, घरात आजी, आजोबा असतील तर अधूनमधून त्यांच्याशी संवाद साधणे, बहीण, भावंडं दूर गावी असतील तर शक्य होईल तेव्हा अधूनमधून त्यांची गाठभेट घेणे, अॉफिसमधील सहका-यांशी सहकार्याचे संबंध ठेवणे, मित्रमैत्रिणींना वेळ देणे, या अशा अनेक प्रकारे आपण आपल्याजवळ भरपूर प्राणवायू साठवू शकतो.
    ...असा प्राणवायू मिळविणे, तो जपणे साठविणे याची आजच्या काळात नितांत गरज आहे; कारण कुटुंबातील सदस्यांची एकमेकांविषयीची कृत्रिम वागणूक वाढतांना दिसत आहे.
 ... चला तर मग, आपण सर्व एकजुटीने हा सगळा प्राणवायू मनसोक्त प्राशन करु या.

     मृदुला मुकुंद पाटखेडकर.

        नोव्हेंबर २०१६.

No comments:

Post a Comment